महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांची मानव संरक्षण समिती च्या भारत देशातील महत्त्वाच्या पदावर निवड*


महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांची मानव संरक्षण समिती च्या भारत देशातील महत्त्वाच्या पदावर निवड*

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) :- मानव संरक्षण समिती (नवी दिल्ली) चे  संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजयजी कुराडे यांच्या उपस्थितीमध्ये श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्रभूषण लोकनेते श्री. सचिन भाऊसाहेब गुलदगड यांची नुकतीच महाराष्ट्र,उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश, कर्नाटक राज्याच्या जनसंपर्क अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

     यावेळी उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उत्तर महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी माधुरीताई उदावंत, महाराष्ट्र गोवा कर्नाटक जनसंपर्क अधिकारी गजानन भगत, श्री संत सावता माळी युवक संघाचे अहमदनगर नाशिक जिल्हा संघटक संपतराव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

   यावेळी श्री. सचिन भाऊसाहेब गुलदगड म्हणाले, मानव संरक्षण समितीच्या जनसंपर्क अधिकारी या नात्याने मी मानव संरक्षण समितीचे कार्य जनसामान्य पर्यंत पोहचविणार व त्यांच्या समस्यांचे निवारण करणार तसेच महाराष्ट्र राज्यात समितीचा विस्तार करण्यासाठी चांगल्या भूमिका घेईल, अस गुलदगड यावेळी म्हणाले.

     या निवडीबद्दल महाराष्ट्राबरोबरच राजस्थान उत्तर प्रदेश कर्नाटक आदि राज्यातूनही अभिनंदनाचा वर्षाव गुलदगड यांच्यावर होत आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News