वीज रोहीत्र व वीज वाहिन्या स्थलांतर करणेसाठी दीड कोटी मंजूर - आमदार आशुतोष काळे


वीज रोहीत्र व वीज वाहिन्या स्थलांतर करणेसाठी दीड कोटी मंजूर  - आमदार आशुतोष काळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव -विधानसभा मतदार संघातील ओव्हरलोड रोहित्र बदलणेसाठी व कमी दाबाच्या वीज वाहिन्या, पोल स्थलांतरीत करण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेत नामदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हा नियोजन समितीमधून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला जवळपास दीड कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विकास कामांच्या समस्येबरोबरच विजेच्या देखील समस्या मोठ्या प्रमाणात होत्या.त्यामुळे गावागावातील नागरिक व शेतकरी विजेच्या समस्येने हैराण झाले होते.अनेक गावांतील रोहीत्रांवर ओव्हर लोड असल्यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा होणे रोहित्र नादुरुस्त होणे या समस्या नित्याच्याच झाल्या होत्या. अनेक ठिकाणी महावितरणचे विजेचे पोल व वीज वाहिन्या स्थलांतरीत करण्याची कामे होत नव्हती. त्याबाबत अनेक शेतकऱ्यांनी व नागरीकांनी आपल्या समस्या आमदार आशुतोष काळे यांच्या जनता दरबारात मांडल्या होत्या. त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी दखल घेऊन या वीज समस्या सोडविण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु होता.

त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून यामध्ये भोजडे पाणीपुरवठा योजनेसाठी भोजडे गावठाणच्या वीजवाहिनीवरून अक्षय प्रकाश योजनेंतर्गत नवीन वीजवाहिनी टाकून नवीन रोहित्र बसविणे, आढाव वस्ती व जानकी विश्व कोपरगाव येथील ३३ के.व्ही. कोळपेवाडी वीजवाहिनी स्थलांतरित करणे, वडांगळे वस्ती कोपरगाव येथील ३३ के.व्ही. कोळपेवाडी वीजवाहिनी स्थलांतरित करणे, ३३ के.व्ही. संवत्सर वीजवाहिनी ओव्हरहेड ते भूमिगत करणे तसेच जगताप वस्ती रोहित्र नं ४२०६२१५ स्थलांतरीत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ५२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तसेच ओव्हर लोड रोहीत्रांवर असलेला लोड कमी करण्यासाठी नवीन २८ रोहित्रांना मंजुरी देवून एक कोटी अठरा लाख सदतीस हजार रुपयांचा निधी देण्यात येणार असून असा एकूण दीड कोटी रुपये निधी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला जिल्हा नियोजन मधून देण्यात येणार आहे. त्यामुळे मागील काही वर्षापासून रखडलेल्या विजेच्या समस्या दूर होण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांना व घरगुती वीज ग्राहकांना पूर्ण दाबाने व सुरळीत विजपुरवठा होवून रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण निश्चीतपणे कमी होणार असल्यामुळे वीज ग्राहक शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून आमदार आशुतोष काळे यांनी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News