जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल मध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !!


जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल मध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगांव तालुक्यातील डाऊच खुर्द येथील जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल मध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. बऱ्याच दिवसांपासून करोना च्या राष्ट्रीय संकटामुळे सर्व शाळा बंद होत्या, तरी जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल ने आपला दर्जा व विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही या करीता ऑनलाईन टिचींग सुरू केले होते. युट्युब व झुम ॲप वर शिक्षण दिले जात आहे याची माहिती या वेळी संस्थेचे सचिव सुनिल होन यांनी दिली. 

प्रजासत्ताक दिन च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सय्यद बाबा शेख हे होते. तर कार्यक्रमाची प्रमुख उपस्थितीती श्री भिमा बारकू होन, श्री मोहन भाऊ गुजर,श्री नुरमोहम्मद शेख श्री गोकुळ नाना गुरसळ,श्री आर आर पाटील होन,जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष श्री भास्करराव होन, जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल चे सचिव श्री सुनिल होन, जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल चे व्यवस्थापकीय संचालक श्री सागर भास्करराव होन, जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल च्या प्राचार्या सौ पल्लवी दळवी, सौ स्वाती वक्ते, सौ ज्योती खरात, सौ पल्लवी होन, सौ नंदा गायकवाड, श्री शरीफ शेख उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News