राजेश मंटाला यांनी पुकारलेल्या आंदोलनाला विवेक कोल्हेंचा पाठिंबा ॥


राजेश मंटाला यांनी पुकारलेल्या आंदोलनाला  विवेक कोल्हेंचा पाठिंबा ॥

संजय भारतीकोपरगाव प्रतिनिधी

कोपरगांव - कोपरगाव शहराचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी एकजूट होण्याची गरज आहे या भावनेने शहराच्या पाणी प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी पुकारलेल्या डिजिटल आंदोलनाला कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन युवानेते श्री.विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी मंटाला यांची भेट घेवुन जाहीर पाठींबा दिला आहे.

   शहराच्या विकासासाठी व जीवन जगण्यासाठी काही महत्त्वाच्या गरजा असतात, पाणी ही त्यातील सर्वात महत्त्वाची गरज आहे. पाणी जीवन आवश्यक आहे. कोपरगांव शहराचा पाणी प्रश्न हा कायमच गंभीर राहिला आहे त्यात पालिकेकडे पाणी साठवण क्षमता कमी असल्याने शहरातील नागरिकांना कधी 6 तर कधी 08 दिवसांनी, तर कधी कधी महिन्यातुन दोनदा पाणी मिळत असल्याने महिला भगिंनीना खुप ञास सहन करावा लागतो. दरवेळी अशीच परिस्थती कायमच असल्याने गंभीर असलेला पाण्याचा प्रश्न कायमवरुपी सुटला पाहिजे यासाठी तत्कालीन आमदार सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी त्यांच्या कार्यकाळात शासनाकडे सतत पाठपुरावा करुन निळवंडे-शिर्डी-कोपरगाव बंदिस्त 

  पाईपलाईनव्दारे पाणी आणण्यासाठी प्रयत्नशील असतांना काहींनी राजकीय खोडा घातल्यामुळे मार्गी लागत असलेला निळवंडे बंदिस्त पाईपलाईनव्दारे मिळणारे पाण्याला अनेक अडथळे आणले व  न्यायालयात देखील आवाहन केले होते परंतु न्यायालयाने वस्तुस्थिती पाहता शहराच्या बाजुने निकाल दिल्याने शहाराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला.

   पाणी प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी एकजूट होण्याची गरज आहे या भावनेने शहराच्या पाणी प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी पुकारलेल्या डिजिटल आंदोलनाला सहभागी असून या आंदोलनास पाठींबा देत आहोत व सर्व नागरिक बंधू भगिनींनीही मोठ्या संख्यने या डिजिटल आंदोलनात सहभागी होऊन अधिकाधिक मेल पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यासाठी पुढाकार घ्यावा व या आंदोलनाची लिंक अधिकाधिक प्रसारित करून ’एक ई-मेल पाण्यासाठी’ या भूमिकेतून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी करुन पुढे म्हणाले की, कोपरगाव शहराच्या पाण्याच्या प्रश्नांसाठी विद्यामान आमदारांना देखील भेटण्याची तयारी असल्याचे विवेक कोल्हे म्हणाले. 

   राजेश मंटाला यांच्याभेटीप्रसंगी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, कोपरगाव भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता  काले, कैलास जाधव, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विनोद राक्षे, बबलू वाणी, हरीश मंटाला, सागर जाधव, विनोद चोपडा, बापू पवार, संदीप देवकर, बाळासाहेब दीक्षित आदी.सह भाजपा, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News