कल्याण रोड येथे जीके फिटनेस लेडीज जिमचे उद्घाटन


कल्याण रोड येथे जीके फिटनेस लेडीज जिमचे उद्घाटन

निरोगी आरोग्यासाठी महिलांनी स्वतःकडे लक्ष द्यावे-अंजलीताई देवकर-वल्लाकट्टी                                                                                                                                            नगर (प्रतिनिधी संजय सावंत) -कल्याणरोड परिसरात प्रथमच लेडीज जिमचा शुभारंभ झाला आहे.यामुळे शहरातील महिलांना  आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल.जी के लेडीज फिटनेस या जिम मध्ये अत्याधुनिक अश्या सुविधा आहेत.निलमताई खंडागळे यांनी जिम सुरु करून महिलांना आरोग्य निरोगी व सुदृढ राखण्यासाठी संधी निर्माण केली आहे.खंडागळे परिवाराने सुनेला पाठींबा देऊन जिम सुरु करण्यास प्रोत्साहन दिले हि अभिमानास्पद बाब आहे.धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला निरोगी आरोग्याची आवश्यकता आहे.महिला निरोगी राहिल्यास कुटुंब निरोगी राहते.निरोगी आरोग्यासाठी महिलांनी स्वतःकडे लक्ष द्यावे.असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू अंजलीताई देवकर-वल्लाकट्टी यांनी केले. शिवाजीनगर कल्याण रोड येथील भावना ऋषी येथे महिलांसाठी जीके फिटनेस लेडीज जिमचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू अंजलीताई देवकर-वल्लाकट्टी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी जागरूक नागरिक मंचाचे सुहासभाई मुळे,देवेंद्र कवडे,पै.भैरवनाथ खंडागळे,जितेंद्र वल्लाकट्टी,नगरसेवक गणेश कवडे,दगडु मामा पवार,दत्ताञय मुदगल,डॉ.दीपक कारखेले,नगरसेविका सोनालीताई चितळे,वैशालीताई नळकांडे,सौ सविताताई शिंदे,कैलास दळवी,गणेश खंडागळे,नीलमताई खंडागळे,प्रा.उत्तमराव राजळे,गंगाधर खंडागळे ,पै.गोरख खंडागळे,बजरंग शेळके,मनोहर शिंदे,किरण खंडागळे,निखील सोनवणे,मंगेश घोरपडे,नितीन थोरात,पप्पू गारदे आदी उपस्थित होते.                          सुहासभाई मुळे म्हणाले की नगर शहरात खंडागळे परिवाराने लेडीज जिमचे उद्घाटन करून महिलांसाठी चांगला उपक्रम राबविला आहे.या जिमचा महिलांनी फायदा घेऊन आरोग्यसंपन्न व्हावे.देवेंद्र कवडे म्हणाले कि,खंडागळे परिवाराने कल्याण रोड परिसरात महिलांसाठी जिम सुरु केली.हि भूषणावह बाब आहे.      प्रास्तविकात निलमताई खंडागळे म्हणाल्या कि,जीके फिटनेस जिम ७ वर्षांपासून सुरु आहे.परंतु महिलांसाठी स्वतंत्र जिम असावी या उद्देशाने लेडीज जिमचा शुभारंभ केला आहे.मला परिवारातील सर्वांचा पाठिंबा मिळाल्यानेच मी हे करू शकले आहे.महिलांनी निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी जिम मध्ये प्रवेश घ्यावा.                                                                          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.उत्तमराव राजळे यांनी केले तर आभार भैरवनाथ खंडागळे यांनी मानले.यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी कल्यानरोड परिसरातील महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.  फोटोवोळी-शिवाजीनगर कल्याण रोड येथील भावना ऋषी येथे महिलांसाठी जीके फिटनेस लेडीज जिमचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू अंजलीताई देवकर-वल्लाकट्टी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.याप्रसंगी जागरूक नागरिक मंचाचे सुहासभाई मुळे,देवेंद्र कवडे,पै.भैरवनाथ खंडागळे,जितेंद्र वल्लाकट्टी,कैलास दळवी,गणेश खंडागळे,नीलमताई खंडागळे,प्रा.उत्तमराव राजळे आदी. (छाया -अमोल भांबरकर)                                                          

जाहिरात
Search
विडिओ
Recent News