बहुप्रतिक्षित स्वदेशी FAU-G गेम अखेर लॉन्च; फीचर्स आणि डाउनलोड बद्दल जाणून घ्या!*


बहुप्रतिक्षित स्वदेशी FAU-G गेम अखेर लॉन्च; फीचर्स आणि डाउनलोड बद्दल जाणून घ्या!*

महाराष्ट्रभुमी  न्यूज नेटवर्क

चायनीज PUBG गेम ने लहानांपासुन मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला वेड लावले होते. चायनीज ॲप्स सरकारने बंद केल्यानंतर PUBG सुद्धा हद्दपार करण्यात आला. 

 PUBG सारखा दुसरा कोणता गेम बाजारात आणता येईल, ज्याला तेवढाच प्रतिसाद लोकांकडून मिळेल असा विचार या क्षेत्रातील मंडळी करत होती. अक्षय कुमारने नुकतीच फौजी गेम ची घोषणा केली होती. प्रजासत्ताक दिनाचे मुहूर्त साधून  आज मेड इन इंडिया मल्टी-प्लेअर मोबाइल गेम FAU-G (Fearless and United Guards) अखेर लाँच करण्यात आला आहे. 

 हा गेम आजपासून प्ले-स्टोअरवर उपलब्ध झाला असून हा गेम अँड्रॉइड युजर्स तिथून डाउनलोड करु शकतात. भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर लोकप्रिय ऑनलाइन बॅटल रॉयल गेम PUBG भारतात बॅन करण्यात आला होता.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News