चापडगाव विद्यालयात ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.


चापडगाव विद्यालयात ७२  वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

चापडगाव विद्यालयात ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक अंतराचे नियम पाळून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावर प्राचार्य परशुराम नेहुल यांनी आपल्या शुभ संदेशामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये शाहिद झालेल्या शूरवीरांची आठवण काढून त्यांच्या कार्याला व विचारांना उजाळा दिला. तसेच कोविड-१९ च्या उपाययोजना आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी सुंदर कवायत करून दाखवली. या कार्यक्रमास कल्याणराव नेमाने, अशोकराव पातकळ, अण्णासाहेब गोरे, विठ्ठल गमे सर, त्रिंबक काटे, पो.पाटील भारत गायकवाड, किरण पातकळ, शहाजी दादा जाधव, बंडू गायकवाड, अण्णासाहेब पातकळ, संतोष गायकवाड, राजेंद्र पातकळ, बाबासाहेब दिवटे तसेच विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व कवायत मार्गदर्शन श्री राम काटे व श्री हरिश्चंद्र मडके सर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहुल जेजुरकर यांनी तर प्रा. सखाराम घावटे यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. व खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News