सुरेश बागल दौंड:प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना महाराष्ट्र राज्य दौंड संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले, यामध्ये प्रमुख मागण्या १४,००० रुपये मासिक पगार मिळावा,आय टी महामंडळात समाविष्ट करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या,संगणक परिचालक यांच्या मागण्या शासनापर्यंत पोचणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी दिली, २५ जानेवारी २०२१रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील ३५१ पंचायत समितीना संघटनेकडून निवेदन देण्यात आले, यावेळी अमोल म्हेत्रे, सतीश थोरात,अविनाश जगताप, स्वाती खंडाळे,रेश्मा भंडलकर,शितल झुरुंगे, आरती जगताप, आशा शिंदे आदीसह संगणक परिचालक दौंड तालुक्यातून उपस्थित होते.