अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी रमेश आप्पा महाराज यांच्या तर्फे ५१ हजार रुपयांची देणगी


अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी रमेश आप्पा महाराज यांच्या तर्फे ५१ हजार रुपयांची देणगी

रामभक्तांचे स्वागत करून श्रीराम मंदिरासाठी देणगी द्यावी -रमेश आप्पा महाराज                                                         नगर (प्रतिनिधी संजय सावंत) -गुरुवर्य माधव स्वामी यांच्या प्रेरणेने हनुमान टाकळी येथे भाविक हनुमंत भक्ती करित आहेत. अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माण होत आहे.प्रत्येकाच्या मनामनामध्ये राम आहे.प्रभू श्रीरामाचे मंदिर व्हावे हि सर्व हिंदू समाजाची भावना आहे.या मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.प्रत्येकाला अयोध्येत जाऊन निधी देणे शक्य नाही.म्हणून विश्व हिंदू परिषद व रा.स्व.संघाने श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र निधी संकलन अभियान नगर जिल्ह्यात सुरु केले आहे.या अभियानात रामभक्तानी सहभागी व्हावे.रामभक्त घरोघरी येऊन निधी संकलन करणार आहेत.रामभक्तांचे स्वागत करून श्रीराम मंदिरासाठी देणगी द्यावी.असे आवाहन हनुमान टाकळी येथील समर्थ स्थापित मारुती मंदिराचे मठपती महंत रमेश आप्पा महाराज यांनी केले.  पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील हनुमान टाकळी येथे समर्थ स्थापित मारुती मंदिरात अयोध्येच्या श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी संकलन अभियानाचा शुभारंभ मठपती महंत रमेश आप्पा महाराज यांच्या हस्ते पावती पुस्तकाचे पूजन करून सुरुवात झाली.याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक अरविंद पारगावकर,अभियानाचे प्रमुख गजेंद्र सोनवणे,सहप्रमुख अनिल रामदासी,संतसंपर्क तालुकाप्रमुख मेजर लवांडे,घनश्याम शिंदे,तिसगाव उपखंडाचे प्रमुख दत्ताभाऊ दारकुंडे,सहप्रमुख पंकज राठी,देवीदास पवार,कौस्तुभ चिंतामणी आदी उपस्थित होते.                                                                             

  कार्यक्रमाची सुरुवात श्रीरामाचे गीताने करण्यात आली.अभियानाच्या सुरुवातीला महंत रमेश आप्पा महाराज  यांनी 51 हजाराची देणगी दिली.तसेच गावातील रामभक्तानी तीस हजार रुपये निधी संकलन केले.                                                                                                                       अनिल रामदासी यांनी अभियानाची माहिती दिली.रामदासी म्हणाले कि.श्रीराम मंदिर अभियानात उस्फुर्तपणे रामभक्तांचा सहभाग होत आहे.रामभक्तांचे योगदान मिळत आहे.ग्रामीण भागात घरोघरी जाऊन निधी संकलन करण्यासाठी रामभक्त जात आहेत.अनेक ठिकाणी रामभक्तांचे स्वागत व दिंडी  मिरवणूक काढून अभियान होत आहे.                                                                          

जाहिरात
Search
विडिओ
Recent News