लोकशाही बळकट राहण्यासाठी मतदार महत्वाचा घटक आहे. -तहसिलदार योगेश चंद्रे


लोकशाही बळकट राहण्यासाठी मतदार महत्वाचा घटक आहे.     -तहसिलदार योगेश चंद्रे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

तहसिल कार्यालय कोपरगाव येथे ११ वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा !

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार महत्वाचा घटक असून नवं मतदारांनी मतदार यादीत नाव असल्याची वेळोवेळी खात्री करुन वेळोवेळी होण्यार्या निवडणूक प्रक्रियेत पवित्र मतदानाचा हक्क जरुर बजावत रहावा असे आवाहन तहसिलदार योगेश चंद्रे यांनी केले.

तहसिल कार्यालय कोपरगाव येथील निवडणूक शाखा वतीने ११ व्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती फलक घेऊन सहभाग घेतला.तसेच तहसिलदार योगेश चंद्रे यांनी त्यांना तशी शपथ दिली.

याप्रसंगी मुख्याध्यापक मकरंद कोर्हाळकर,दिलीप तुपसैंदर रमेश गायकवाड, रघुनाथ लकारे, निलेश बडजाते, अतुल कोताडे, बलभीम ऊल्हारे,दत्तात्रय विरकर,अनिल काले,योगेश गवळी,राहुल चौधरी,श्रीकांत डांगे यांचे सह शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

मतदार दिवसाचे सुत्रसंचलन समन्वयक सुशांत घोडके यांनी केले.तर आभार निवडणूक शाखेचे अरुण रणनवरे यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News