कोपरगावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघाने जिंकला सरसेनापती चषकाचा अंतिम सामना !!


कोपरगावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघाने जिंकला सरसेनापती चषकाचा अंतिम सामना !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

 कोपरगांव तालुका क्रिकेट असो.व मुंबादेवी तरुण मंडळ,शिवसेना शाखा धत्रपती चौक यांच्या वतीने लक्ष्मी आई स्टेडियम बाजार तळ या ठीकाणी सर सेनापती चषक राज्यस्तरीय टेनिसबाॕल स्पर्धा दिनांक २०जानेवारी ते २४जानेवारी या कालावधीत कोपरगाव तालुका क्रिकेट असो.चे संस्थापक अध्यक्ष कै.दीपक माळी यांचे स्मरणार्थ आयोजित केली होती.या स्पर्धात ३५संघानी भाग घेतला होता.

    या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी कोपरगांव तालुका क्रिकेट असो.अध्यक्ष डाॕ.अजेय गर्जे होते. या स्पर्धत

छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब.कोपरगांव यांनी अंतिम फेरीत विजय मिळवत (कोपरगांव तालुका क्रिकेट असोच्या व मुंबादेवी तरुण मंडळच्या वतीने)३० हजार रु.रोख व  चषक असे प्रथम पारितोषिक मिळवले

द्वितीय पारितोषिक दादा पोटे क्रिकेट संघ.कोपरगांव(कोपरगांव तालुका क्रिकेट असो. व मुंबादेवी तरुण मंडळच्या वतीने)२०हजार रु.रोख व चषक

तृतीय-साई इलेवन शिर्डी(आयुर ड्राॕप,श्री.भरत मोरे यांच्या वतीने)१०हजार रु.रोख व चषक

चतृर्थ-टीळक चौक .कोपरगांव.(श्री.मनोज नरोडे.यांच्या वतीने)५हजार रु.रोख व चषक


या संपुर्ण स्पर्धातुन मॕन आॕफ द मॕच चे बक्षीस दादा पोटे संघाच्या श्री.सुनिल मुळेकर* या खेळाडुने पटकावले

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत  मुंबादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष श्री.सुनिल फंड यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोपरगांव तालुका क्रिकेट असो.चे उपाध्यक्ष श्री.मकरंद को-हाळकर यांनी केले

.सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धा भरविण्याचा मान मिळाला असुन या स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल त्यांनी कोपरगांवच्या क्रिकेट रसिकांचे आभार मानले.

         या कार्यक्रमाला असो.चे  डाॕ.दीपक नाईकवाडे, मुंबादेवी तरुण मंडळाचे संतोष चव्हाण,शिवसेना नेते भरत मोरे,संजय जगताप,भाऊ माळी,सुनिल खैरे, भाजप शहराध्यक्ष श्री.दत्तात्रय काले,मनसे प्रमुख संतोष गंगवाल,शिवनारायण परदेशी,शिवसेना शहर प्रमुख कलविंदर डडीयाल,विक्रांत झावरे,भाऊसाहेब भाबड,मनोज नरोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सुत्र संचलन असो.सचिव श्री.मनोज कपोते यांनी केले तर आभार खजिनदार राजेंद्र होन यांनी मानले.

 या प्रसंगी पंच ,गुणलेखक व स्वयंसेवक म्हणुन काम केलेल्या खेळाडुंचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी असो.चे सदस्य रिजवानखाॕ पठाण,तुषार विव्दांस ,तसेच श्री.मनोज विसपुते,महेश आमले, ओम कपोते,नंदु देवळालीकर, आदिंनी विशेष परीश्रम घेतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News