देशातील पहिल्या आनंद दर्शन डायलिसिस क्लबचे प्रजासत्ताक दिनी उद्घाटन !! सुधीर मेहता यांची संकल्पना


देशातील पहिल्या आनंद दर्शन डायलिसिस क्लबचे प्रजासत्ताक दिनी उद्घाटन !! सुधीर मेहता यांची संकल्पना

  नगर (-प्रतिनिधी संजय सावंत) रुग्ण सेवा ..आणि आपल्या समस्या आपणच सोडवण्याचा आनंद देणारा, किडनी रुग्णांना सहकार्य आणि मार्गदर्शन करणारा "श्री आनंद दर्शन डायलिसिस क्लब" या अभिनव उपक्रमास प्रजासत्ताक दिनी शुभारंभ होत असल्याची माहिती संयोजक सुधीर मेहता यानी दिली.

     आनंदऋषीजी हॉस्पिटलचे प्रमुख पदाधिकारी संतोष बोथरा आणि सर्व विश्‍वस्त, प्रशासकीय अधिकारी डॉ.आशिष भंडारी, किडनी रोग तज्ञ डॉ.गोविंदवल्लभ कासट  यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्‍या उपक्रमात डायलिसिस रुग्णांना मार्गदर्शनासाठी विविध वैद्यकीय शिबिरे सहकार्यासाठी अनेक उपक्रम सातत्याने हाती घेतले जाणार आहेत.

     काही रुग्णांमध्ये डायलिसिस बाबत खूप गैरसमज आणि शंका असतात. भीतीपोटी उपचार टाळल्याने काहींना खूप त्रास सहन करावा लागला तर मागच्या काही महिन्यात काही रुग्ण दगावले आहेत. तर ग्रामीण भागातून आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये असलेल्या सुविधा किंवा राजीव गांधी, महात्मा फुले योजनेची माहितीच नाही. अनेक संस्था  आणि सरकार यासाठी मोठे सहकारी देत असताना काही रुग्ण माहिती अभावी फायदा घेत नाहीत ; हा अनुभव आल्यानंतर  रुग्ण डॉक्टर आणि हॉस्पिटल या समन्वयातून हा अभिनव क्लब साकारला जात असून हा प्रकल्प निश्‍चितपणे वरदान ठरेल असा विश्‍वास सुधीर मेहता यांनी व्यक्त केला असून रुग्ण आणि नातेवाईकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुधीर मेहता यांनी केले आहे.


     या उपक्रमासाठी डॉ. भंडारी, डॉ गोविंद कासट यांच्या मार्गदर्शनाखाली संकेत पुरोहित,डॉ. याशोदीपा कांकरिया, परमजित सभरवाल, दिपक  धेंड, जिंक्य देशमुख सर्व स्टाफ प्रयत्नशील असून ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी मो. 9284640477, 9423793375 आणि 9423793365  या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन झाल्यानंतर हॉस्पिटल आवारात 8 चे दरम्यान होणार्‍या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News