दौंड पोलिसांनी पकडली चोरीची बोलेरो,पहाटे फिल्मी स्टाईल पाठलाग,चार तासात गाडी मालकाकडे


दौंड पोलिसांनी पकडली चोरीची बोलेरो,पहाटे फिल्मी स्टाईल पाठलाग,चार तासात गाडी मालकाकडे

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील राशीन येथून चोरी करून आणलेली बोलेरो गाडी चोरांचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून पकडली,आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले,दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीची गस्त सुरू होती,त्यावेळी दौंड शुगर कारखाना येथे एक बोलेरो गाडीत डिझेल भरण्याचे काम चालू होते त्यावेळी दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार पांडुरंग थोरात,असिफ शेख,पो नाईक धनंजय दाभाडे,किरण राऊत,पो कॉन्स्टेबल अमोल गवळी,अमोल देवकाते,रवि काळे आणि होमगार्ड यांनी त्यांना हटकले काय करताय रे,आणि ते डिझेल भरता भरता  बोलोरे घेऊनच पळाले,त्यामुळे पोलिसांना त्यांचा संशय आल्यामुळे त्यांचा पाठलाग केला,पहाटेच्या वेळी फिल्मी स्टाईल पाठलाग सुरू झाला,ते चोर लिंगाळी रोडने जोरात गाडी चालवत अंधाराचा फायदा घेऊन गाडी सोडून पळून गेले,अज्ञात चोरांच्या विरोधात दौंड पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदरच्या गाडी मालकाची माहिती घेऊन कागदपत्रे तपासून पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या हस्ते ती गाडी सदर मालकास चार तासात परत केली,त्यावेळी गाडी मालकाने पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि सर्व टीमचे आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News