कोपरगांवचे युवक आयडाॕल विवेक कोल्हे यांचा युवा संजीवनी पुरस्काराने सन्मान


कोपरगांवचे युवक आयडाॕल विवेक कोल्हे यांचा युवा संजीवनी पुरस्काराने सन्मान

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी         

कोपरगाव-  युवकांचे आयडाॅल म्हणुन ओळखले जाणारे कोपरगांव तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन, संजीवनी युवा प्रतिष्ठाणनचे संस्थापक अध्यक्ष विवेक कोल्हे यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने युवा संजीवनी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.        

जागवूया ज्योत माणुसकीची या मूलमंत्राच्या- ध्येयाच्या आधारे सामाजिक कार्याची,युवकांचे संघटन व सामर्थ्यशाली विचारांची पताका खांद्यावर घेवून युवा, पर्यावरण, कृषी, सामाजिक व आरोग्य या पंच सूत्राच्या सर्वांगांना स्पर्श करीत समाजाला- युवकांना सामर्थयशाली व सर्वगुणसंपन्न करण्यासाठी  विवेक कोल्हे यांनी राष्ट्रीय युवा दिनी तालुक्यातील युवकांना एकत्र करून दि १२ जानेवारी २०१५ रोजी संजीवनी युवा प्रतिष्ठाणची स्थापना केली या प्रतिष्ठानचा प्रत्येक सदस्य प्रामाणिकपणे आपआपली जबाबदारी पूर्ण करत श्रम व वेळ लावून गेल्या ५ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. इतक्या कमी अल्पवधीतच संघटनेने गरुड झेप घेतली आहे. कोल्हे हे कर्तबगार, स्पष्टवक्तेपणा, शिस्तप्रिय, सकारात्मक विचार, समाजाबद्दल आपुलकी, उत्तम निर्णयक्षमता, सोज्वळ व्यक्तिमत्व, अभ्यासु व जाणकार व्यक्तिमत्व. न्यायाची चाड बाळगणारा  ज्येष्ठ, युवक ते लहानाच्या  हदयात आदराचे स्थान मिळवणारे सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.नुकताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तरुणांचा आयडॉल म्हणून कोल्हे यांची प्रशंसा केली आहे. युवा प्रतिष्ठाने आज पर्यंत कोपरगाव मतदार संघातील हजारो युवकांचे संघटन करून प्रथमच २०१८ व २०१९ या दोन्ही वर्षात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळयाचे उत्कृष्ट आयोजन केले होते. लोकसहभागातून ११ हजार वृक्षांचे संरक्षक जाळीसह वृक्षारोपन, तालुका भर रक्तदान शिबीरे,आरोग्य शिबीरे, मोफत श्रवण यंत्रे व चष्मे वाटप, २४ तास अॕम्बुलन्स सुविधा, युवकांना करिअर मार्गदर्शन, शिवजयंती उत्सव, रामनवमी उत्सव, गुरुपौर्णिमा उत्सव, तसेच क्रिडा स्पर्धा, गरजूंना आर्थिक मदत, एक राखी जवानांसाठी, दहीहंडी उत्सव, दहीहंडी उत्सव बक्षिसाची ५१ हजार रुपये पूरग्रस्तांना मदत निधी, कोपरगाव शहर व तालुक्यात आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्य, गणपती सजावट स्पर्धा, यशस्वी विध्यार्थ्यांनचा गुणगौरव, श्रमदान, शालेय विद्यार्थीना मदत,महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथी अशा शेकडो उपक्रमांनी अनेकांनी निस्वार्थ मदत, तसेच नुकताच प्रतिष्ठान चा ६ व्या वर्धापन दिनी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र कोरोना रुग्णाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तालुक्यातील आरोग्य, पोलिस प्रशासन व नगरपालिका स्वछता विभागातील महिला कर्मचारी आदींचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला ,अशा एक ना अनेक कामाची दखल घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघननेच्या वतीने विवेक कोल्हे यांचा कोपरगाव तालुका अध्यक्ष मनीष जाधव, उपाध्यक्ष जनार्दन जगताप, शहराध्यक्ष हफिज शेख, उपशराध्यक्ष स्वप्नील कोपरे, सचिव विनोद जवरे, सह-सचिव विजय कापसे, योगेश गायके, फकिरा टेके, अनिल दीक्षित, अमोल गायकवाड, मधुकर वक्ते, अक्षय काळे, राहुल कोळगे, समाधान भुजाडे, सुनील ससाणे, सोमनाथ डफळ, संदीप विदुर, सुमित थोरात, रविंद्र जगताप, रविंद्र साबळे आदी संघटनेचे सभासदांच्या उपस्थित सन्मान करण्यात आला. या वेळी तालुका अध्यक्ष मनीष जाधव यांनी पत्रकार संघटना राज्यभर आपल्या माध्यमातून करत असलेल्या कार्याची माहिती दिली. तर कार्यक्रमाचे प्रास्तविक योगेश गायके यांनी तर आभार जनार्दन जगताप यांनी मांडले.

महाराष्ट्र राज्य मराठी संघटना करत असलेले कार्य कौतुकास्पद असून संघटनेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो.

विवेक कोल्हे, संस्थापक अध्यक्ष संजीवनी युवा प्रतिष्ठाण

जाहिरात
Search
विडिओ
Recent News