बारा बलुतेदार महासंघ व सकल नाभिक समाजाच्या वतीने आदर्श नेत्रदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल बोरुडे यांचा सत्कार


बारा बलुतेदार महासंघ व सकल नाभिक समाजाच्या वतीने आदर्श नेत्रदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल बोरुडे यांचा सत्कार

बोरुडे यांनी माणुसकीच्या भावनेने वंचित घटकांना आधार देण्याचे कार्य केले -ज्ञानेश्‍वर गायकवाड

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना आदर्श नेत्रदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल बारा बलुतेदार महासंघ व सकल नाभिक समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील नाभिक समाजाच्या समाज मंदिरात पार पडलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर (माऊली) गायकवाड, ओबीसी व्हीजेएनटीचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, शहराध्यक्ष अनिल इवळे, शहर उपाध्यक्ष श्यामराव औटी, अनिल निकम, रमेश बिडवे, राजेश सटाणकर आदी उपस्थित होते.

ज्ञानेश्‍वर (माऊली) गायकवाड म्हणाले की, फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी माणुसकीच्या भावनेने वंचित घटकांना आधार देण्याचे कार्य केले. कोरोना व महागाईच्या संकटामुळे अनेक गरजू आरोग्य सुविधेपासून वंचित आहे. दुर्बल घटकांसाठी आरोग्य चळवळ उभी करुन मनुष्यरुपी सेवेतूनच ईश्‍वरसेवा करण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनेने सुरु केलेली आरोग्य चळवळ प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब भुजबळ यांनी समाजाला निस्वार्थ भावनेने कार्य करणार्‍यांची खरी गरज आहे. फिनिक्स फाऊंडेशनचे कार्य निस्वार्थ भावनेने सुरु आहे. अनेक वर्षापासून गरजू घटकातील नागरिकांना माणुसकीच्या भावनेने आरोग्यसेवा देण्यात येत आहे. महागाईच्या काळात आरोग्यसेवा खर्चिक असल्याने सर्वसामान्यांना न परवडणारी झाली असल्याने फिनिक्सचे आरोग्य शिबीर गरजूंना आधार ठरत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News