स्वातंत्र्यासाठी नेताजींचा तर मराठी माणसाच्या अस्मितेसाठी स्व. बाळासाहेबांचा लढा स्फुर्ती देणारा -जालिंदर बोरुडे


स्वातंत्र्यासाठी नेताजींचा तर मराठी माणसाच्या अस्मितेसाठी स्व. बाळासाहेबांचा लढा स्फुर्ती देणारा -जालिंदर बोरुडे

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) नेताजी सुभाषचंद्र भोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी 27 नागरिकांचा अवयवदानाचा संकल्प फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- दुसर्‍यांसाठी जगणारी माणसे अजरामर होतात. नेताजी सुभाषचंद्र भोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची प्रखर राष्ट्रभक्ती आजच्या पिढीला दिशादर्शक आहे. या महान व्यक्तींनी आपले आयुष्य इतरांसाठी वेचले.  देशाच्या स्वातंत्र्यासाठी नेताजींचा तर मराठी माणसाच्या अस्मितेसाठी स्व. बाळासाहेबांचा लढा स्फुर्ती देणारा असल्याची भावना फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी व्यक्त केली. 

नेताजी सुभाषचंद्र भोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी बोरुडे बोलत होते. यावेळी जितेंद्र आढाव, वैभव दानवे, बाबासाहेब धीवर, किरण कवडे, सौरभ बोरुडे, तुषार मरकड, विठ्ठल राहिंज आदी उपस्थित होते.

नेताजी सुभाषचंद्र भोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबीरात फाऊंडेशनच्या वतीने नेत्रदान व अवयवदानबद्दल जनजागृती करण्यात आली. 27 नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला. त्यांचा फाऊंडेशनच्या वतीने अवयवदानाचे अर्ज भरुन घेण्यात आले. या शिबीरास परिसरातील ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला. शिबीर यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे सदस्य व नागरदेवळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News