नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम विद्यार्थ्यांना मास्क तर शाळेला सॅनीटायझरची भेट
अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या जनजागृतीसाठी नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन मास्कचे वाटप करण्यात आले. तर शाळेला सॅनीटायझरची भेट देण्यात आली.
डॉ. महेश मुळे यांनी विद्यार्थ्यांना सदृढ व निरोगी आरोग्याचे महत्त्व पटवून, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले. तर कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजनेची माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, काशीनाथ पळसकर, दत्तात्रय जाधव, रामेश्वर चेमटे, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, तुकाराम खळदकर, मयुर काळे, लहानबा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, नवनाथ फलके आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.