कोपरगाव पाणी प्रश्न ई-मेल आंदोलन प्रमुख श्री.राजेशशेठ मंटाला व सामाजिक कार्यकर्ते श्री. आनंदराव टिळेकर यांनी जलशक्तीचे श्री. सुशांतजी घोडके यांची भेट घेतली. !!


कोपरगाव पाणी प्रश्न ई-मेल आंदोलन प्रमुख श्री.राजेशशेठ मंटाला व सामाजिक कार्यकर्ते श्री. आनंदराव टिळेकर यांनी जलशक्तीचे श्री. सुशांतजी घोडके यांची भेट घेतली. !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी .

कोपरगाव शहरातील पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करुन नियमित पाठपुरावा करणारे समाजसेवक श्री.राजेशशेठ मंटाला यांनी भारत सरकारचे स्वच्छतादूत व जलशक्ती अभियानचे श्री. सुशांतजी घोडके यांची सदिच्छा भेट घेतली आहे.

याप्रसंगी विविध सामाजिक चळवळीत सहभागी असणारे श्री.आनंदराव टिळेकर त्यांचे समवेत होते.

     कोपरगाव शहरात सर्वसामान्य जनतेला वर्षानुवर्षे पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्यासाठी संकटाला सामोरे जावे लागत आहे.या करिता वेगवेगळ्या पातळीवर अनेकांनी प्रयत्न केलेले आहे.परंतू अद्यापही हे संकट कायम आहे.पाण्याचे संकट निवारण्यासाठी अनेकांचे सकारात्मक प्रयत्नही राहिले आहे.कोपरगांव शहरात कधी चार तर कधी आठ दिवसाआड तर कधी एकवीस दिवसांनी पाणी पुरवठा केला गेला आहे. पाणी टंचाईमुळे बेरोजगारी,बाजारपेठेपासून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत.त्यामुळे आपल्या निस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेतून श्री.राजेशशेठ मंटाला परिवार केंद्र .व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करत आहे.

      कोपरगावच्या पाणी ई-मेल आंदोलनाबाबत अनेकांचा पाठिंबा मिळत आहे.तसेच जाणकार व मान्यवरांचे सदिच्छा भेटीतून सल्ला व मार्गदर्शन घेतले जात आहे.तसेच अनेक नागरिक स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले .आहेत.

पाण्याच्या समस्या अनेक ठिकाणी आढळून येतात.भारत .सरकार व महाराष्ट्र शासन यांचेकडे सन २०१८ साली या गंभीर समस्येबाबत पाण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय असावे अशी संकल्पना भारत सरकारचे स्वच्छतादूत श्री.सुशांतजी घोडके यांनी मांडली होती त्यावर सन २०१९ या वर्षात केन्द्रीय पातळीवर जलशक्ती मंत्रालय स्थापन प्रक्रीया सुरु झाली.या माध्यमातून .केंद्र व राज्य पातळीवर वेगवेगळ्या उपक्रमांना सुरुवात झाली.या अभ्यासपुर्ण संकल्पनेची दखल अनेक ठिकाणी घेऊन पाण्याची समस्या काही प्रमाणात दूर करण्यात मदत झाली.त्यामुळे पाणी ई-मेल आंदोलनाचे श्री.राजेशशेठ मंटाला, सामाजिक कार्यकर्ते श्री.आनंदराव टिळेकर यांनी जलशक्तीचे श्री.सुशांतजी घोडके यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जाते.

    कोपरगावच्या पाणी टंचाईकडे वरिष्ठ पातळीवर लक्ष वेधले जावे या भावनेतून प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना २४,२५,२६ जानेवारी २०२१ या कालावधीत ई-मेल पाठवले जाणार आहे.या साठी मंटाला यांनी ईमेल पत्राचा मजकूर सह एक लिंक तयार केली असून त्या लिंक द्वारे एकाच वेळी प्रधानमंत्री,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना ई-मेल पोहोच होणार आहे.

   याबाबत कोपरगाव येथील रहिवासी असलेल्या प्रत्येकाने या ईमेल आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन ते करत आहे. पाणी प्रश्नाबाबत त्यांचे वैयक्तिक पत्राची दखल प्रधानमंत्री कार्यालयाने घेतली असून असे हजारो ई-मेल केंद्रीय व राज्य सरकारकडे एकाच वेळी कोपरगावचे नागरिकांनी पाठविल्यास त्याची दखलही घेतली जाण्याची शक्यता आहे. याच भावनेतून कोपरगाव पाणी आंदोलन प्रणेते श्री.राजेशशेठ मंटाला यांनी कोपरगावातील अनेक संकटात निस्वार्थ व .निर्भिडपणे मदतकार्य करणारे श्री.सुशांतजी घोडके यांचे समवेत सुमारे एक तास या संदर्भात चर्चा झाली आहे.कोपरगाव पाणी. आंदोलन प्रणेते श्री.राजेशशेठ मंटाला यांचे समवेत सामाजिक कार्यकर्ते श्री. आनंदराव टिळेकर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News