दौंड मध्ये 27 जानेवारीला रास्ता रोको,आर पी आय आठवले गटाचे निवेदन,निकृष्ठ रस्त्याविरोधात होणार एल्गार


दौंड मध्ये 27 जानेवारीला रास्ता रोको,आर पी आय आठवले गटाचे निवेदन,निकृष्ठ रस्त्याविरोधात होणार एल्गार

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

 -- दौंड शहरातून जाणारा मनमाड ते बेळगाव हा गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून सुरू आहे, कामाच्या सुरवातीपासूनच रस्ता वादात सापडला आहे,24 मीटर चा असणारा रस्ता 18 मीटर होत आहे,त्यातही रस्त्यात येणारे अतिक्रमण हटवले जात नाही,त्या विरोधात,दौंड नगरपालिका  नगरसेवक यांच्या सह सर्वसामान्य जनताही रस्त्यावर उतरून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला, परंतू या ठेकेदारांना अभय कोणाचे आहे तेच कळत नाही,त्यांची रस्त्या विषयी मनमानी सुरूच आहे, याच विरोधात दौंड रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) बुधवार दिनांक 27 जानेवारी रोजी दौंड येथे रास्ता रोको करणार आहेत,त्याविषयीचे निवेदन दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांना देण्यात आले,निवेदनात म्हटले आहे की दिनेशचंद्र अग्रवाल आणि कंपनीच्या हलगर्जीपणा मुळे दौंडच्या  जनतेला त्रासाला सामोरे जावे लागत आहे, अर्धवट कामांमुळे दुचाकी,चारचाकी गाड्यांचे नुकसान होत आहे, खड्डयांमुळे मणक्याचे विकार वाढले आहेत, धुळीमुळे डोळ्यांचे आजार,अंधत्व येत आहे, पुढे काम चालू असताना मागे चेंबर खचत आहेत,नगरमोरी चौकात रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघात झाला होता त्यावेळी  दौंड चे  तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी स्वतः पहाणी करून ठेकेदारावर गुन्हा दाखल केला होता,परंतू ठेकेदार यांच्यावर कोणताही परिणाम होताना दिसत नाही,तीन वर्षे झाली तरी रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे, त्या विरोधात रास्ता रोको केला जाणार आहे,असे विकास कदम यांनी सांगितले, यावेळी पंचायत समिती सदस्य विकास कदम,आर पी आय नेते भारत सरोदे,लिंगाळीचे माजी सरपंच नरेश डाळींबे,दौंड तालुका कार्याध्यक्ष नवनाथ गायकवाड,निलेश बनकर,डॉ दत्तात्रय  जगताप,कुरकुंभ शाखाध्यक्ष संतोष गायकवाड, अशोक मोरे,सुधाकर चितारे,सिद्धार्थ मासाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News