समता फौंडेशन तर्फे वाहतुक शाखेत मोफत नेञ तपासणी!! प्रत्येकाने डोळ्याची काळजी घ्यावी-विकास देवरे


समता फौंडेशन तर्फे वाहतुक शाखेत मोफत नेञ तपासणी!!  प्रत्येकाने डोळ्याची काळजी घ्यावी-विकास देवरे

नगर( प्रतिनिधी संजय सावंत) -प्रत्येकाने डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. डोळा हा महत्त्वाचा अवयव असल्याने डोळ्यांची योग्य ती काळजी प्रत्येक वाहनचालकाने घेणे आवश्यक आहे.समता फाउंडेशन तर्फे डोळ्यांची मोफत तपासणी व चष्मे वाटप हे कार्य कौतुकास्पद आहे.असे प्रतिपादन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी केले आहे.                             

             पञकार चौक येथे रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त शहर वाहतूक शाखा व समता फाउंडेशन तर्फे मोफत नेञ तपासणी करण्यात आली.व गरजुंना मोफत चष्मा वाटप करण्यात आली.याप्रसंगी वाहनचालक,व्यापारी, रिक्षाचालक व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या प्रसंगी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास देवरे, एपीआय प्रकाश पाटील, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब वाघमारे,हवालदार संजय शिंदे, संजय सोनवणे,संजय गवळी, अजूसेठ आऊजा, महादेव बडे भास्कर रोकडे, अशोक रोकडे, अनील गरुड ,सचिन काळे, रोहित अहुजा, नेत्रदान समुपदेशक संतोष अहिरे ,समता फाऊंडेशनचे मोहन केंद्रे, दीपक मतकर ,डॉक्टर सतीश चौधरी, डॉक्टर तांबोळी आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News