बोधेगाव उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावाच्या शेती पंपाचा विद्युत पुरवठा पूर्ण क्षमतेने सुरू करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंधळे यांनी दिला


बोधेगाव उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावाच्या शेती पंपाचा विद्युत पुरवठा पूर्ण क्षमतेने सुरू करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंधळे यांनी दिला

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

बोधेगाव उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांच्या शेतीपंपाचा विद्युत पुरवठा पूर्णक्षमतेने व सुरळीत करा अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे  निवेदन जनशक्ती विकास आघाडीचे उपाध्यक्ष संजय आंधळे यांनी आज उपअभियंता लोहारे साहेब, म. रा. वि. वि. कंपनी, शेवगाव यांना दिले. यावेळी सोमनाथ आंधळे, जालिंदर बर्डे, बाळासाहेब बर्डे, भुजंग फुंदे, अर्जुन काशिद, ऋषिकेश ढाकणे, हेमंत पातकळ आदि यावेळी उपस्थित होते. निवेदनात पुढे म्हंटले आहे की, तालुक्याच्या पूर्व भागातील बालमटाकळी उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांच्या शेतीपंपांचा विद्युत पुरवठा गेल्या चार दिवसापासून विस्कळीत झालेला आहे. कोणत्याही शेतकऱ्याचे शेतीपंप चालत नाहीत. कमी जास्त दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने कित्येक शेतकऱ्यांचे शेतीपंप जळाले आहेत. गोळेगाव येथील अनेक शेतकऱ्यांच्या देखील विद्युत मोटारी जळाल्या असून दि.२०/०१/२०२१ रोजी तीन रोहित्र निकामी झाले आहेत. विस्कळीत झालेल्या विद्युत प्रवाहामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके पाण्याअभावी जळू लागले असून हाता तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांना मुकावा लागेल अशी परिस्थिती तयार झाली आहे. गोळेगाव येथील पाणीवाटपाची मोटार देखील गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याने लोकांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्याप्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत करून खराब झालेले रोहित्र तातडीने दुरुस्त करावेत व शेतीपंपाचा विद्युत पुरवठा पूर्णक्षमतेने करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल याची असा इशाराही यावेळी देण्यात आला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News