संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव मधील प्रसिध्द डॉक्टर डॉ.महेंद्र गोंधळी यांच्या कामाची दखल घेत भारतीय वैद्यकीय संघटनेने (IMA) त्यांची भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) शाखा कोपरगाव अध्यक्षपदी निवड केली. त्याबद्द्ल त्यांचा सन्मान कोपरगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) शाखा नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.महेंद्र गोंधळी
यांचा हार व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंगेश पाटील म्हणाले की,कोरोना काळात डॉक्टरांनी केलेले कार्य हे उल्लेखनीय असुन कोरोना काळात डॉक्टर जणुकाही देवदूत भासत होते.
कोरोना काळात जेव्हा सामान्य माणूस आपला जीव कोरोना रोगापासून वाचविण्यासाठी घरात सुरक्षित राहत होता .मात्र अशा जीव घेण्या परिस्थितीत ही डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना सेवा देण्याचे काम केले. कोपरगाव आय.एम.ए.अध्यक्ष डॉ. महेंद्रजी गोंधळी हे संघटनेच्या माध्यमातून कोपरगाव मधील नागरीकांना आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहतील असा विश्वास मंगेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी कोपरगाव औद्योगिक वसाहतचे संचालक डॉ.चंद्रशेखर आव्हाड, डॉ. मेघाताई गोंधळी, स्वच्छतादूत सुशांत घोडके, छायाचित्रकार हेमचंद्र भवर उपस्थित होते