मुर्शतपुर येथे विकासकामांचे भूमीपूजन करतांना आमदार आशुतोष काळे.
संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर ग्रामपंचायतीच्या विशेष अनुसूचित जाती योजनेअंतर्गत विहीर बांधकाम तसेच दलित वस्तीमध्ये सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कडेला पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमीपूजन नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक हरिभाऊ शिंदे, सरपंच साधनाताई दवंगे, उपसरपंच मनिषाताई गिरमे, विष्णू शिंदे, शिवाजी दवंगे, शांतीलाल शिंदे, सुनील गिरमे, नितीन शिंदे, शशिकांत दवंगे, संजय दवंगे, सुभाष दवंगे, प्रमोद शिंदे, शिवाजी शिंदे, रोहिदास मोरे, नवनाथ दवंगे, जालिंदर शिंदे, काकासाहेब शिंदे, आबा ढोले, डॉ. अनिल दवंगे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, शाखा अभियंता अश्विन वाघ, ग्रामसेवक सुनील राजपूत आदी उपस्थित होते.