कोपरगाव तालुका पोलीसांनी केली डंपर चोरणारी टोळी जेरबंद !!


कोपरगाव तालुका पोलीसांनी केली डंपर चोरणारी टोळी जेरबंद !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

दि. २ जानेवारी २०२१रोजी झगडेफाटा येथील दादासाहेब शहाजी रोहमारे यांच्या पेट्रोल पंपावरून एम एच -२४ .जे ७००८या क्रमांकाचा दहा टायर डंपर चोरीला गेल्याची घटना  धक्कादायक घटना घडली असुन डंपर मालक सतिष पुरूषोत्तम देशमुख रा.कोल्हे रोड छत्रपती कॉलनी गेवराई यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली आहे.

सविस्तर वृत्त असे कि दि. २ जानेवारी २०२१ रोजी १५ .३०ते १६.०० वाजे दरम्यान झगडेफाटा सिन्नर रोडवरील दादासाहेब शहाजी रोहमारे यांचे पेट्रोल पंपावरून एम एच २४ जे ७००८या क्रमांकाचा दहा लाख रुपये किमतीचा दहा टायर डंपर कणीतरी चोरटयाने चोरून नेला म्हणुन दि.१०जानेवारी रोजी  कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला रजि नां१५ /२०२१ भा दं वी क ल म ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हाचे गांभिर्य लक्षात घेता वरीष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनानुसार तपास सुरू होता.

 दि. २१ जानेवारी पोलिस निरीक्षक दौलराव जाधव यांनी सर्व तांत्रीक बाबींचे विश्लेशन करुन तपास सुरू केला.पोलिसी कयासाच्या आधारावर सदरचा गुन्हा हा राहुल कैलास घनगाव रा. भोजडेता कोपरगाव याने केल्याची माहीती उजेडात आली. त्याची विचारपुस केली असता त्यांने माहिती दिली कि तो आणि त्याचे आरोपी साथीदार प्रताप उर्फ पप्पू रमेश काटे रा.धोत्रे ता.कोपरगाव,रोहित संजय घाटे रा.धोत्रे ता.कोपरगाव, अशोक अर्जुन आहेर रा. भोजडे.ता कोपरगाव यांनी हा दहा टायर डंपर कोपरगाव नजिक असलेल्या झगडे फाटा दादासाहेब शहाजी रोहमारे पेट्रोल पंपावरून चोरून नेल्याचा गुन्हा कबूल केला. या कबुली जबाबवरून कोपरगाव तालुका पोलिसानी वरील सर्व आरोपींना ताब्यात घेऊन डंपर चोरी विषयी अधिक विचारपूस केली असता सदर चा डंपर फिरोज मन्सूर शेख रा. मेहुनबारे,ता.चाळीसगाव,जि गाव यास विक्री केल्याचे सांगितले

पुढील तपास कामे पोलिस अधीक्षक यांची परवानगी घेऊन कोपरगाव तालुका पोलीस ठाणे पथकाने

मेहुनबारे,ता.चाळीसगाव,जि जळगाव येथे जाऊन चोरीस गेलेला दहा टायर डंपर व विकत घेणारा इसम फिरोज मन्सूर शेख यास शिताफीने ताब्यात घेतले आहे. वरील सर्व आरोपींना न्यायालयाने दिनांक २५ जानेवारी २०२१ पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड दिली असून सदरचा गुन्हा हा कोपरगाव तालुका पोलिसांनी उघडकिस आणला त्यामुळे कोपरगाव तालुका पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर कौतुकास्पद कामगिरी पोलिस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव, पो.स.इ सचिन इंगळे,पो.हे.कॉ अर्जुन बाबर,,पो.हे.कॉ इरफान शेख, पो.कॉ जयदीप गवारे,होमगार्ड वायकर व सायबरसेल कार्यालय श्रीरामपूर चे पो.कॉ प्रमोद जाधव यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News