चांदेकसारे परीसरात चोरी सत्र सुरूच !!


चांदेकसारे परीसरात चोरी सत्र सुरूच !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

चांदेकसारे परीसरातुन १oहजार रुपये किमतीचे बोकड व शेळी दि.२० जानेवारी रात्री अज्ञात चोरटयांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. 

सविस्तर माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील चांदेक सारे गावाचे रहिवासी विलास भास्कर होन यांनी आपल्या घराशेजारील जनावरांसाठी बांधलेल्या शेडमध्ये पाच हजार रुपये किमतीची आपली एक बांड्या रंगाची पाच महिने वयाची शेळी,तसेच काळा बोकड डोक्यावर पांढरा टिपका तसेच लांब कान असलेला बोकड बांधुन ठेवले होते ते नेहमी प्रमाणे झोपी गेले असता सकाळी उठून त्यांनी आपल्या शेड मधील शेळी व बोकड यांचा आढावा घेतला असता जनावरे आपल्या जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आजुबाजुला शेतात शोध घेतला तसेच गावातील ग्रामस्थांकडे चौकशी केली पण कुठेच शोध लागला नाही.त्यामुळे त्यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

या अगोदर आठ दहा दिवस पुर्वी फिर्यादी भास्कर होन यांच्या शेळ्या चोरीस गेल्या असुन चांदेकसारे नजीक जेऊर कुंभारी गावात मागील महिन्यात

सोपान पोपटराव वक्ते यांच्या राहत्या घरासमोरुन बजाज फ्लॉटिना गाडी चोरी गेलेली आहे. त्यामुळे चांदेकसारे , डाऊच , जेऊर कुंभारी परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुका पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरूद्घ गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्ग दर्शनाखाली साहय्यक फौजदार एम . ए. कुसार हे करीत आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News