आखेगावच्या उपसरपंचपदी वृंदावनी डोंगरे


आखेगावच्या उपसरपंचपदी वृंदावनी डोंगरे

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेवगाव : तालुक्यातील आखेगाव ग्रामपंचायतच्या उप सरपंचपदासाठी झालेल्या निवणडणूकीत वृंदावनी दादासाहेब डोंगरे ह्या एकमताने विजयी झाल्या.

      उपसरपंच शिवाजी नाचण यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी वृंदावनी डोंगरे यांना व त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मनोहर काटे यांना समान प्रत्येकी पाच मते पडली, यावेळी सरपंच बाबासाहेब गोर्डे यांनी मतदानाचा हक्क बजावत डोंगरे यांच्या पारड्यात मत टाकल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून बाबासाहेब गोर्डे यांनी विजयी झाल्याची घोषणा केली. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक संतोष कातकडे यांनी काम पाहिले, त्यांना फलकेवाडीचे ग्रामसेवक अविनाश म्हस्के यांनी सहकार्य केले. आखेगाव ग्रामपंचायतीत १२ सदस्य संख्या असून त्यापैकी एक जण गैरहजर राहिल्याने ११ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान एका सदस्याने मत पत्रिकेवर शिक्का न मारल्याने "ती" मतपत्रिका बाद ठरवण्यात आली. यावेळी ग्रामसेवक संतोष कातकडे, लिपिक रामदास पायघन, ग्रामपंचायत सदस्य शंकर काटे, अंबिका खर्चन , मुक्ताबाई नाचणं, गंगूबाई मराठे, शीतल नाचणं, अमोल ससाणे, भाऊसाहेब पायघन आदी उपस्थित होते, तर विद्या ससाणे ह्या बाहेरगावी असल्याने गैरहजर होत्या.

     निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. डोंगरे ह्या विजयी होताच काटेवाडी, आखेगावात जल्लोष साजरा करण्यात आला. वृंदावनी डोंगरे ह्या पत्रकार दादासाहेब डोंगरे यांच्या पत्नी आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News