शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवून त्यांचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी अ‍ॅग्रो रुर्बन अर्थव्यवस्था आनण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचा पुढाकार


शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवून त्यांचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी  अ‍ॅग्रो रुर्बन अर्थव्यवस्था आनण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचा पुढाकार

अ‍ॅग्रो रुर्बन अर्थव्यवस्थेचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवणार -अ‍ॅड. कारभारी गवळी

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवून त्यांचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी अ‍ॅग्रो रुर्बन अर्थव्यवस्था आनण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदने पुढाकार घेतला असून, अ‍ॅग्रो रुर्बन अर्थव्यवस्थेचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. 

देशातील शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी शेतकरी संरक्षण कायद्याची गरज असताना, त्यांच्यात बदल घडविण्यासाठी अ‍ॅग्रो रुर्बन अर्थव्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ग्रामीण भागात रोजगार नसल्याने शहरात रोजगार मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने युवकांचे लोंढे येतात. ग्रामीण भागात अ‍ॅग्रो रुर्बन अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून नवीन कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार झाल्यास युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. ग्रामीण भागात मुलींना पदवी पर्यंतचे शिक्षण स्थानिक पातळीवर मिळण्यासाठी मदत होणार आहे. खेड्यांना शहरीकरणाचे रुप येणार असून, शेती मालावर प्रक्रिया करणारे उद्योगधंद्याची साखळी देखील निर्माण होणार आहे. ग्रामीण भागात अशिक्षितपणा नाहीसा होऊन युवकांना रोजगार मिळाल्यास गावांचा झपाट्याने विकास होणार आहे. ईस्त्रायल, अमेरिका सारख्या राष्ट्रांमध्ये असलेल्या शेतकर्‍यांप्रमाणे भारतातील शेतकर्‍यांचे जीवनमान सुधारणार आहे. रुर्बन अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना शेतीचे आधुनिक तंत्र अवगत करुन क्रांतीकारक पध्दतीने बदल घडविण्यासाठी संघटनेचा पुढाकार राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुबळे असल्याने आत्महत्या करीत आहे. शेतकर्‍यांना शेतकरी संरक्षण कायद्याशिवाय पर्याय नसून, अ‍ॅग्रो रुर्बन अर्थव्यवस्था त्यांचे जीवनमान व राहणीमान बदलणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा हा प्रयोग असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. अ‍ॅग्रो रुर्बन अर्थव्यवस्थेसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News