दौंड पाटस रस्त्यावर डंपिंग करताना विजेच्या तारेचा करंट, तरुणाच्या प्रसंगावधानामुळे ड्रायव्हरचे वाचले प्राण


दौंड पाटस रस्त्यावर डंपिंग करताना विजेच्या तारेचा करंट, तरुणाच्या प्रसंगावधानामुळे ड्रायव्हरचे वाचले प्राण

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

-- दौंड पाटस रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच आहे,काल सायंकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान रस्त्यासाठी लागणारा मुरूम डपंर मधून  विजय हॉटेल च्या पुढे डंपिंग करत असताना रस्त्याच्या वर असणाऱ्या विजवाहक ताराना डंपर चिकटला,सुदैवाने ड्रॉयव्हर खाली उतरला होता,ड्रॉयव्हर खाली उतरून सर्व मुरूम पडला का ते पहाण्यासाठी गाडीच्या मागच्या बाजूला आला होता,परंतू तोपर्यंत डंपिंग वर असणाऱ्या ताराना जाऊन चिकटला होता,चालकाचा गाडीला लागायला आणि करंट यायला एकच वेळ झाली,गाडीचे सर्वच्या सर्व टायर फुटले,आणि चालक तडफडत होता तेथील हॉटेल विजय चे मालक दादा सोनवणे यांनी  लगेचच विजवीतरण कार्यालय दौंड येथे फोन करून वीज प्रवाह बंद करण्यास सांगितले, तोपर्यंत गर्दी जमा झाली होती परंतू त्या चालकाच्या मदतीला कोणीही पुढे येईना, स्वतः दादा सोनवणे यांनी पळत येऊन त्या चालकाला बाजूला घेऊन एका जीप मध्ये बसवून खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाठवले,सोनवणे यांनी प्रसंगावधान दाखवले म्हणून ड्रॉयव्हरचे प्राण वाचले.अजून किती अपघात झाल्यानंतर ठेकेदार स्वतः कामावर हजर राहून काम वेगात करतील,सुपरवायझर नेमून देतात आणि दुसऱ्या कामावर जातात,जिथे कच्चा रस्ता आहे त्याच्या 500 मीटर पुढे काम चालू असल्याचे माहिती फलक कुठेही लावले नाहीत,त्यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकी चारचाकी चे अपघात होत आहेत, या हलगर्जीपणामुळे एका महिलेला याच रस्त्यावर आपले प्राण गमवावे लागले आहेत.दादा सोनवणे यांच्या तातपरतेमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले त्यामुळे त्यांचे परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News