बारामती : प्रतिनिधी ,काशिनाथ पिंगळे
बारामती कृषी पर्यटन केंद्र पळशी व मुक्ती एग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यातील पळशी याठिकाणी शेतकरी मेळावा घेण्यात आला.
अरविंद तावरे यांनी शेतीशी निगडित व्यवसायसंधी व शेती औषधे याबाबत उपस्थित शेतकर्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. मार्केटिंग विषयी श्रीकांत जाधव यांनी शेतकरी बांधवांना माहिती दिली.
यावेळी मुक्ती ग्रुपचे प्रमुख प्रफुल्ल तावरे, कृषी पर्यटन केंद्राचे प्रमुख पांडुरंग तावरे, अनंत तावरे, दत्तात्रय माळशिकारे, विजय भापकर, मनोहर भापकर यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार माधुरी नलवडे यांनी मानले.