प्रभू श्रीरामाचे मंदिर हे स्वाभिमानाचे प्रतीक-अमोल भांबरकर


प्रभू श्रीरामाचे मंदिर हे स्वाभिमानाचे प्रतीक-अमोल भांबरकर

श्रीराम मंदिरासाठी युवकांचा निधी संकलनाचा संकल्प                                       अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत -) श्रीराम मंदिर निर्माणासाठी सरकारी पैसे घेतले जाणार नाहीत.तसेच कोणत्याही एका परिवाराकडून बांधले जाणार नाही.संतांच्या प्रेरणेने सर्व भारतीयांचा खारीचा वाटा असावा.या हेतूने 'श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र' न्यास तर्फे नगर जिल्ह्यात श्री राम मंदिर निर्माण निधी संकलन अभियान १  जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहे.सर्वांचा हातभार असावा या हेतूने गावोगावी घरोघरी जाऊन रामभक्त निधी संकलनाचे कार्य करीत आहे या कार्यात सर्व रामभक्तांनी योगदान द्यावे.प्रभू श्रीरामाचे मंदिर हे राष्ट्र मंदिर असून भारतीयांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे.असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मीडिया प्रमुख अमोल भाबरकर यांनी केले.                                          श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीसाठी मदत व्हावी व सतत कार्य घडावे.यासाठी विसापूर गावातील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात बैठक पार पडली.यावेळी गावात घरोघरी जाऊन भाविकांच्या इच्छा शक्तीप्रमाणे लोकवर्गणी जमा करण्याचा संकल्प युवकांनी केला.प्रारंभी काळ भैरवनाथ मंदिरात महाआरती व निधी संकलन पुस्तकांच पूजन करून निधी संकलन कार्याचा  शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मीडिया प्रमुख प्रमुख अमोल भांबरकर बोलत होते.याप्रसंगी रा.स्व.संघाचे श्रीगोंदा तालुका प्रमुख संदीप चौधरी,संदेश दहिवले,सावता लबडे,अनुप शेठ घोडेकर,काका जठार,नवनाथ शिंदे,अमोल जगताप,अमोल जठार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. संदीप चौधरी म्हणाले कि,४९२ वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर होत आहे.हि सर्व भारतीयांसाठी आनंदाची बाब आहे.९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम मंदिराची जन्मभूमी हि रामलल्लाची आहे.हा अभूतपूर्व निकाल दिल्याने ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होऊन श्रीराम मंदिर निर्माण कार्य सुरु झाले आहे.हा सर्वांसाठी भाग्याचा सुवर्णक्षण आहे.                                                                        श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या निधी संकलन कार्याचा  शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मीडिया प्रमुख प्रमुख अमोल भांबरकर, रा.स्व.संघाचे श्रीगोंदा तालुका प्रमुख संदीप चौधरी,संदेश दहिवले,सावता लबडे,अनुप शेठ घोडेकर,काका जठार,नवनाथ शिंदे,अमोल जगताप,अमोल जठार आदी.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News