डाॅ. कोळपे दापंत्याचा संजीवनी उदयोग समुहाच्या वतीने सत्कार !!


डाॅ. कोळपे दापंत्याचा संजीवनी उदयोग समुहाच्या वतीने सत्कार !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोळपेवाडी येथील डाॅ. दत्तात्रय म्हसू कोळपे आणि डाॅ सौ नयना कोळपे यांची तातडीने मदत मिळाल्याने सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उस तोडणी कामगार महिलेची प्रसुती सुखकर पार पडली. या डाॅ कोळपे दांपत्यांचा संजीवनीचे व्हा.चेअरमन आप्पाासाहेब दवंगे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. संजीवनीचे माजी व्हा.चेअरमन निवृत्ती कोळपे, संचालक राजेंद्र कोळपे, राजेंद्र देशमुख, अजित सैंदर,चेतन कोळपे यावेळी उपस्थित होते.

 सध्या कारखाने सुरू असल्याने विविध भागातून उस तोडणी कामगार उस तोडणीसाठी आलेले आहे. विघनवाडी ता.सिन्नर येथील तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास असलेल्या  एका ऊस तोडणी कामगार कुटूंबातील महिला गरोदर असतांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी कारखाना व्यवस्थापनाशी संपर्क केला असता व्यवस्थापनाने तातडीने त्यांना रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली. सदर महिलेला घेऊन रूग्णवाहिका रूग्णालयाच्या दिशेने जात असतांना कोळपेवाडी शिवारात सदर महिलेला प्रसुती वेदना असहय झाल्या. रात्रीची वेळ असल्याने डाॅक्टर उपलब्ध होण्यास अडचण येत असतांना रूग्णवाहिका चालकाने प्रसंगावधान राखत डाॅ दतात्रय म्हसू कोळपे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत विनंती केली असता क्षणाचाही विलंब न करता डिलीव्हरी रूम अथवा कोणतीही सुविधा उपलब्ध नसतांना डाॅ कोळपे दांपत्य मदतीसाठी धावून आले. रूग्णवाहिकेतच सदर महिलेची प्रसुती केली. डाॅ कोळपे यांनी तातडीने सेवा दिल्याने त्या महिलेचे बाळंतपण सुखरूप पार पडले. आई व बाळ सुरक्षित असुन त्यांना सुखरूप घरी सोडले. त्यांनी दिलेल्या सेवेबददल सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याच्या वतीने चेअरमन बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांनी आभार मानले. व्हा.चेअरमन आप्पासाहेब दवंगे यांनी उदयोग समुहातर्फे डाॅ कोळपे दांपत्याच्या क्लिनिकमध्ये जाऊन कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सत्कार केला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News