मनपाच्या ब्लड बँक खाजगीकरणाची मंजुरी रद्द करावी..शिवराष्ट्र सेनेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी


मनपाच्या ब्लड बँक खाजगीकरणाची मंजुरी रद्द करावी..शिवराष्ट्र सेनेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

नगर (प्रतिनिधी संजय सावंत -) अहमदनगर महानगरपालिकेचे मावळते आयुक्त यांनी ब्लड बँक खाजगीकरण करण्याची प्रक्रियावर दि.31 तारखेलास दिलेली मंजुरी रद्द करण्यात यावी, या मागणीचे निवेदन शिवराष्ट्र सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी तथा आयुक्ता यांना देण्यात आले. याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, दलित आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल शेकटकर, बाबा करपे, शंभु नवसुपे, गणेश शेकटकर, समीर खडके, अक्षय कांबळे आदि उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महानगर पालिका क्षेत्रात बर्‍याच वर्षांपासून सेवा देणार्‍या महानगरपालिकेच्या बाळासाहेब देशपांडे ब्लॅड बँक खाजगी तत्वावर देण्याचा घाट मावळते आयुक्त व काही सहाकरी यांनी केले आहे. ही प्रक्रिया दि. 31 डिसेंबर 2020 रिटायर्ड होण्याची शेवटची तारखेस बहुतांशी फाईलीवर सह्या करताना ब्लड बँकेच्या खाजगी करणाच्या मंजुरीसही सही केली आहे. विशेष म्हणजे इतर पुणे, नाशिक, मुंबई या मनपात स्वत: प्रशासन ब्लड बँक चालवते हे विशेष आहे. नगर शहरातील 6 ते 7 लाख नागरिक विविध मनपाचा कर भरतात त्या बदल्यात महानगरपालिकेकडून त्यांना माफक दरात रक्ताची बाटली मिळणे जरुरीचे आहे.

     यापुढे खाजगीकरणात ब्लड बँक चालविण्यास दिल्यास जी 350 रु. रक्ताची बाटली मनपा देत होती, तीच रक्ताची बाटली खाजगी ब्लड बँक 1450 रुपयांना दिली जाईल. हा मोठा नागरिकांवर अन्य होईल. याचे कारण म्हणजे शासनाने मनपास 22 कामगारांचे ग्रॅण्ड दिलेली आहे. व शासनाकडून मोफत औषधे सुद्धा मिळतात. तसेच मोठ-मोठी मशनरी सुद्धा शासनाने स्वत:च्या खर्चातून दिलेली आहे. तसेच जी ब्लॅड बँक आज वास्तूत उभी आहे ती वास्तू कै.बाळासाहेब देशपांडे यांनी मोफत दान केलेली आहे. यात त्यांचा जो उद्देश होता, तो धुळीस मिळणार आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजयेपी यांनी या ब्लड बँकेचे उद्घाटन केले आहे.

     तरीही नागरिकांच्या फायद्याची ब्लड बँक काही सहकारी, खाजगी तत्ववार देत आहे. मग मनपाचा विविध पदाचा स्टाफ इतर ठिकाणी देऊन नुसता बसून ठेवायचा का? त्यामुळे मावळते आयुक्त साहेबांनी घाई-घाईने घेतलेली मंजुरी रद्द करुन मनपाने त्या जागी स्वत: ब्लड बँक चालू करावी, अन्यथा शिव राष्ट्र सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची सर्व जबाबदारी मनपा प्रशासनाची राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News