कोपरगावात सरसेनापती चषक राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धचे आयोजन !!


कोपरगावात सरसेनापती चषक राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धचे आयोजन !!

कोपरगाव. कोपरगांव तालुका क्रिकेट असो.व मुंबादेवी तरुण मंडळ,शिवसेना शाखा धत्रपती चौकयांच्या वतीने लक्ष्मी आई स्टेडियम बाजार तळ या ठिकाणी सर सेनापती चषक राज्यस्तरीय टेनिसबाॕल स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे .

 दिनांक २०जानेवारी ते २४जानेवारी या कालावधीत होणारी हि स्पर्धा संस्थापक अध्यक्ष कै.दीपक माळी यांचे स्मरणार्थ आयोजित केलेली आहे. 

या स्पर्धा चे उदघाटन कोपरगांवचे वैदयकीय अधिकारी श्री.कृष्णा फुलसुंदर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी कोपरगांव तालुका क्रिकेट असो.अध्यक्ष डाॕ.अजेय गर्जे होते. कोपरगांव शहराचे प्रथम नागरीक श्री.विजय वहाडणे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुंबादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष श्री.सुनिल फंड यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोपरगांव तालुका क्रिकेट असो.चे उपाध्यक्ष श्री.मकरंद को-हाळकर यांनी केले.

सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धा भरविण्याचा मान मिळाला असुन कोपरगांवतील क्रिकेट रसिकांच्या आग्रहा मुळे ही स्पर्धा या लोकप्रिय मैदानावर प्रथमच भरवित असल्याची माहीती आयोजकांनी दिली आहे. याप्रसंगी शहराध्यक्ष श्री.दत्तात्रय काले,मनसे प्रमुख संतोष गंगवाल,शिवनारायण परदेशी,भाऊ माळी,बाळासाहेब रुईकर,जालिंदर मुरकुटे,आदी मान्यवर उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सुत्र संचलन असो.सचिव श्री.मनोज कपोते यांनी केले तर आभार खजिनदार राजेंद्र होन यांनी मानले.

आज प्रगत शिवाजी रोड,धत्रपती ,वाय.सी.सी येसगांव,कोनपा आणि जय लक्ष्मी आई व साई असे सामने झाले.त्यात धत्रपती,दादा पोटे,जय लक्ष्मी आई व साई पुढच्या फेरीत दाखल झाले.

या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कोपरगाव तालुका क्रिकेट असो.चे सदस्य तुषार विध्दंस,मनोज विसपुते,महेश आमले आदि विशेष परीश्रम घेत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News