श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने हिवरे बाजारच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार...गावे आदर्श करण्यावर लक्ष केंद्रित करणार - पोपटराव पवार


श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने हिवरे बाजारच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार...गावे आदर्श करण्यावर लक्ष केंद्रित करणार  - पोपटराव पवार

नगर (प्रतिनिधी संजय सावंत -) हिवरे बाजारकडे आम्ही केवळ एक गाव म्हणून पाहत नाही तर अन्य गावांना दिशा देणारे ते केंद्र आहे.  त्यामुळे गावातील प्रत्येक घडणार्‍या घटनांना महत्व असते. 1990 पासून गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरु झाली. तेव्हा पासून हे गाव कधीच निवडणुकीला सामोरे गेले नाही, मात्र यंदा प्रथमच गावकरी निवडणुकीला सामोरे गेले. यावेळी निवडणूक बिनविरोध होऊ शकली नसली, तरी निवडणूक कशी असावी, याचाही आदर्श घालून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. सर्वजण एकत्रित राहून गावाच्या विकासासाठी पुढाकार घेऊन योगदान देतील. त्याचबरोबर आता राज्यातील अन्य गावे आदर्श करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. श्री विशाल गणेशाच्या दर्शनाने एकप्रकारे त्याचा शुभारंभ करत असल्याचे प्रतिपादन आदर्शगांव हिवरे बाजारचे नवनिर्वाचित सदस्य पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.आदर्श गाव हिवरे बाजार ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवारांनी श्री विशाल गणेश मंदिर आरती करुन दर्शन घेतले. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी नवनिर्वाचित सदस्य पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह सर्व सदस्यांचा देवस्थानच्यावतीने सत्कार केला. याप्रसंगी पुजरी संगमनाथ महाराज, देवस्थानचे विश्‍वस्त रामकृष्ण राऊत, पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, ज्ञानेश्‍वर रासकर, चंद्रकांत फुलारी,  सौ.शोभाताई पवार आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, गाव कसे आदर्श असावे, याचे उत्तम उदाहरण म्हणून हिवरे बाजारकडे पाहिले जाते. हे गाव आदर्श बनविण्यात पोपटराव पवारांचा मोठा वाटा आहे. गेल्या 30-35 वर्षांपासून गावात विकास कामांची गंगा आणून गावाचा चेहरा-मोहरचा बदलून टाकला आहे.आज अनेक देश-विदेशातील राजकीय, प्रशासकीय अधिकारी, पर्यटक या गावात झालेले विकास कामे पाहण्यासाठी येत आहेत. त्याचप्रमाणे पोपटराव पवार यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराने नगर जिल्ह्याच्या लौकिकात भर पडली आहे. या गावात झालेले निवडणुकही आदर्श लोकशाहीचे उदहारण होते. इतर गांवानी त्यांचा आदर्श घेऊन आपल्या गावांचा विकास करावा, असे आवाहन केले.     यावेळी रोहिदास पवार, स.या.पवार, एस.टी.पादीर, आर.के.चत्तर, मिना गुंजाळ, विमल ठाणगे, सुरेखा पादीर, रंजना पवार, मंगल पादीर, बबलू रोहोकले, रंगनाथ रोहोकले, राजेंद्र सातपुते आदिंचा देवस्थान विश्‍वस्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News