गायकवाड कॉम्प्युटर सेंटर व कोचिंग क्लासेस मार्फत न्यू इंग्लिश स्कुल येथे करियर सेमिनार


गायकवाड कॉम्प्युटर सेंटर  व कोचिंग क्लासेस मार्फत न्यू इंग्लिश स्कुल येथे करियर सेमिनार

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

न्यू इंग्लिश स्कूल येथे करियर डे अंतर्गत करियर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील समुपदेशक श्रीमती व्हि .व्हि.बेल्हेकर मॅडम यांनी केले. तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले मार्गदर्शक श्री .अजिंक्यदेव गायकवाड सर ,सौ. सुषमा गायकवाड मॅडम, श्री .कल्हपुरे सर ,श्री. कुरकुटे सर यांनी करियर निवडीची जीवनाच्या जडणघडणीसाठी आवश्यकता व योग्य करियर निवडीचे जीवनातील महत्व सांगितले.त्यांनी 10 वी नंतर पुढे काय या विषयी बहुमोल मार्गदर्शन केले.स्पर्धा परीक्षेतून उपलब्ध होणाऱ्या विविध संधी विषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी संगणक प्रशिक्षण MSCIT, स्पोकन इंग्लिश तसेच NEET, JEE सारख्या प्रवेश परीक्षा याबाबत सविस्तर माहिती दिली. या परीक्षांचा व बोर्ड परीक्षेचा सराव व्हावा यासाठी गायकवाड अकॅडमी मार्फत मोफत ऑनलाइन टेस्ट देण्यात येणार असल्याचेही घोषित केले. या प्रसंगी विद्यालयाचे जेष्ठ  शिक्षक श्री.गायधने सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विद्यालयातील सर्व सेवकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.आभार प्रदर्शन श्री. राजळे सर यांनी केले.अशा रीतीने विद्यालयात  करियर डे उत्साहात संपन्न झाला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News