एस. टी. कर्मचा-यांना लॉकडाऊन हजेरी दया अन्यथा उपोषण-इंटकचा आंदोलनाचा इशारा


एस. टी. कर्मचा-यांना लॉकडाऊन हजेरी दया अन्यथा उपोषण-इंटकचा आंदोलनाचा इशारा

विठ्ठल होले विषेस प्रतिनिधी :

 राज्य परिवहन दौंड अगारातील कर्मचा-यांच्या व्यक्तीगत व सामुहीक प्रश्नांची सोडवणूक करण्या संदर्भात आगार व्यवस्थापक दौंड यांना वारंवार तोंडी व लेखी निवेदन देऊनही अद्याप लॉकडाऊन हजेरी देण्यात आलेली नाही त्यामुळे रा. प. कर्मचा-यांमध्ये प्रचंड असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. तसेच सातत्याने प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पाठपूरावा करून सुध्दा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे भविष्यात कर्मचा-यांची खदखद बाहेर येऊन आंदोलन अथवा अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दौंड आगारातील कर्मचा-यांना लॉकडाऊन काळातील सर्व कर्मचा-यांना शासन निर्णयानुसार लॉकडाऊन हजेरी देण्यात यावी. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा विशेष कामगीरी बजावणा-या एस. टी. कर्मचा-यांना रा. प. प्रशासनाच्या परिपत्रकानुसार ३०० रु. विशेष प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात यावा. माहे ऑक्टोबर महिन्यातील हजेरी/स्पेअर दिवस देण्यात यावा. आजारी कर्मचा-यांना कर्तव्यावर येण्यासाठी जबरदस्ती करू नये. वाहतुक नियंत्रक व लिपिक टंकलेखक परीक्षा पास असलेल्या सेवाजेष्ठ कामगारांना वाहतुक नियंत्रक, लिपीक म्हणून वापरण्यात यावे. या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने रा. प. कर्मचा-यांच्या व्यक्तीगत व सामुहीक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दि. २० जानेवारी, २०२१ रोजी उपोषण करण्यात येणार आहे. असे निवेदन मा. आगार व्यवस्थापक दौंड, विभाग नियंत्रक पुणे, पोलीस निरीक्षक दौंड यांना इंटक संघटनेचे अध्यक्ष श्री. अशोक पवार, सचिव संतोष वारे यांनी दिले.

दि. १३ जानेवारी, २०२१ रोजी मा. कामगार अधिकारी, मा. विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी पुणे व आगार व्यवस्थापक दौंड यांच्यासमवेत इंटक संघटनेची मिटींगचे आयोजन केले होते परंतु कर्मचा-यांना लॉकडाऊन हजेरी देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली नसल्यामुळे उपोषणावर ठाम असल्याचे इंटक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

वरील प्रमुख मागण्या व इतर मागण्यांसाठी दि. २० जानेवारी, २०२१ रोजी उपोषण करण्यात येणार असल्याचे दत्तात्रय तिगोटे, राज्यसहसचिव, रमेश शिंदे विभागीय सचिव, अशोक पवार अध्यक्ष, संतोष वारे सचिव यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News