अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्ट्स को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल नाना डोंगरे यांचा सत्कार


अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्ट्स को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने  ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल नाना डोंगरे यांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - निमगाव वाघा ग्रामपंचायत निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे मताधिक्याने ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्ट्स को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र पवार, प्रशांत लोखंडे, प्रसेन कुरापाटी, संतोष हरबा, शशिकांत ढगे, अंकुश मोकाटे, गणेश सावंत, आर.एन. चव्हाण आदी उपस्थित होते.

राजेंद्र पवार म्हणाले की, जनतेने काम करणार्‍या व्यक्तीला संधी दिली असून, डोंगरे गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहून कार्य करणार असल्याचे सांगितले. नाना डोंगरे यांनी गावाचा विकास हेच ध्यास ठेऊन आज पर्यंत सामाजिक कार्य करीत आलो असून, जनतेने दिलेल्या संधीचे सोने करुन गावाच्या विकासात योगदान देणार असल्याचे सत्काराला उत्तर देताना सांगितले. निमगाव वाघा ग्रामपंचायत निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे मताधिक्याने ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्ट्स को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने त्यांचा सत्कार करताना बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र पवार, प्रशांत लोखंडे, प्रसेन कुरापाटी, संतोष हरबा, शशिकांत ढगे, अंकुश मोकाटे, गणेश सावंत, आर.एन. चव्हाण आदी. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News