शेवगावात राष्ट्रवादी 20,भाजपा 9 स्थानिक आघाडी 17 शिवसेना 1 जागेवर बाजी अनेक ठिकाणी सत्तांतर भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे ,सोनवणे यांना धक्का राष्ट्रवादीचे राजेंद्र दौंड यांनी मारली बाजी


शेवगावात राष्ट्रवादी 20,भाजपा 9 स्थानिक आघाडी 17 शिवसेना 1 जागेवर बाजी अनेक ठिकाणी सत्तांतर भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे ,सोनवणे यांना धक्का राष्ट्रवादीचे राजेंद्र दौंड यांनी मारली बाजी

 शेवगा़व प्रतिनीधी सज्जाद पठाण

शेवगाव तालुक्यातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 20, भाजपला 9 स्थानिक सर्व पक्षीय आघाडी 18 ,शिवसेना 1 बाजी मारली अनेक प्रस्थापितांना धक्का दिला आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांचे पिंगेवाडीत मंडळाचा तर आखतवाडे येथे माजी जिप सदस्य  बाळासाहेब सोनवणे दारुण पराभव झाला 

पिंगेवाडी 

येथे राष्ट्रवादीचे नंदकिशोर मुंडे, अशोक तानवडे यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या मंडळाचा मोठ्या फरकाने दारुण पराभव करून ९ पैकी ९ जागा मोठ्या फरकाने जिंकून ही ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे हसनापूर 

येथे तिरंगी लढत होऊन केदारेश्वरचे संचालक भगवान महासंघाचे गणेश ढाकणे,यांनी 5 जागा   जिंकून भाजपाचे अर्जुन ढाकणे संपत ढाकणे यांच्या मंडळाचा पराभव करून वर्चस्व मिळविले आहे चुरशीच्या लढतीत विद्यमान सरपंच संपत ढाकणे यांचा गणेश ढाकणे यांनी पराभव करून ग्रामपंचायत ताब्यात घेतली 

गायकवाड जळगाव 

येथे राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे सर्जेराव हिंगे,अण्णासाहेब केसभट,सुरेंद्र केसभट, चंद्रकांत गवारे यांच्या मंडळाने 9 पैकी 5 जागा जिंकून भाजपचे रमेश केसभट यांच्या मंडळाचा पराभव केला,

सुकळी 

येथे राष्ट्रवादीचे प्रल्हाद देशमुख यांच्या मंडळाने भाजपाचे विक्रम देशमुख यांच्या मंडळाचा पराभव केला तर 

आखतवाडे

 येथे राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर उगले, रवी राशीनकर, सुनील उगले आप्पासाहेब पुंडेकर, यांच्या मंडळाने 11 जागा मिळवून भाजपचे माजी जिप सदस्य बाळासाहेब सोनवणे यांच्या मंडळाचा दारुण पराभव केला तर पत्नी वर्षा सोनवणे  यांना पराभव पत्करावा लागला  आहे

 चापडगाव 

येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाने,शिवसेनेचे भारत लोहकरे, यांनी 11 पैकी 10 जागा जिंकून भाजपा प्रणित मंडळाचा पराभव करून सत्ता हस्तगत केली येथे चुरशीच्या झालेल्या लढतीत शहादेव पातकळ व सत्यनारायण मुंदडा यांना समान मते पडल्याने चिठ्ठी टाकण्यात आली नशिबाने शहादेव पातकळ यांना साथ दिली 

लखमापुरी 

येथे राष्ट्रवादीचे अशोक गावंडे, संदीप हिंगे भाऊसाहेब आंबडे यांच्या मंडळाने 5 जागा मिळवून भाजपचे विद्यमान सरपंच शरद चाबुकस्वार यांच्या मंडळाचा पराभव केला 

 हातगाव 

येथे राष्ट्रवादीचे शिवाजीराव पाटील यांच्या मंडळाने 7 तर भाजपा प्रणित मंडळाने 6 जागा मिळविल्या आहेत 

कांबी येथे तिरंगी लढतीत बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच सुनील रजपूत यांच्या मंडळाने 9 जागा मिळविल्या तर पंजाबराव पारनेरे यांच्या मंडळास 2 जागा मिळाल्या केदारेश्वरचे संचालक सुरेशचंद्र होळकर यांच्या मंडळास एकही जागा मिळाली नाही  

नागलवाडी 

येथे बाळासाहेब ढाकणे, केशव आंधळे यांच्या मंडळास 3 तर विद्यमान सरपंच गोरख खेडकर, राम गिते, संदीप गीते यांच्या मंडळास 3 तर राजू जाधव यांच्या मंडळास 3 जागा मिळाल्या आहेत 

अधोडी

 येथे 6 जागा बिनविरोध झाल्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शोभा भागवत सोले यांनी बाजी मारली 

अंतरवली खुर्द

 येथे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष एकनाथ कसाळ यांच्या मंडळाने 6 जागा मिळवून बाजी मारून  विरोधी मंडळाचा पराभव केला अंतरवली बुद्रुक येथे भाजपाचे नितीनराव काकडे यांना मानणाऱ्या मंडळास 5 जाग तर विरोधी मंडळास 2 जागा मिळाल्या आहेत 

कोळगाव 

येथे भाजपाने 9 जागा मिळविल्या आहेत विरोधी राष्ट्रवादी दारुण पराभव झाला  तर 

नवीन दहिफळ येथे 

सविता बाळासाहे शिंदे यांना नशिबाने साथ दिली 

शेकटे बुद्रुक

 येथे जगनाथ गरड यांच्या मंडळास 4 तर मोहनराव रसाळ यांच्या मंडळास 3 जागा मिळाल्या आहेत 

बोडखे 

येथे बाळासाहेब वेताळ यांच्या मंडळास 5 तर विद्यमान सरपंच नाना वेताळ यांच्या गटास 2 जागा मिळाल्या आहेत 

वाडगाव येथे गावकरी मंडळास 6   जागा मिळवून विद्यमान सरपंच सविता आप्पासाहेब जवरे यांना पराभव पत्करावा लागला आहे  

नजीक बाभूळगाव येथे गावकरी मंडळास 6 तर सोपान दोरकुळे गटास 3 मिळाले रानेगाव येथे श्रीरंग वाघ गटास 6 तर श्रीकृष्ण पालवे गटास 3 जागा मिळाल्या आहेत शिंगोरी येथे शिवसेनेचे नानाभाऊ चेमटे, ज्ञानदेव चेमटे, चेमटे मेजर यांनी 6 जागा मिळविल्या तर काशीनाथ चेमटे, प्रभाकर चेमटे यांच्या राष्ट्रवादी-भाजपा प्रणित मंडळास 3 जागा मिळाल्या आहेत. चेडेचांदगाव  येथे राष्ट्रवादी प्रणित मंडळाने बाजी मारली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News