श्रीम.सुनिता इंगळे( सूर्यवंशी) यांच्या गुज मनीचे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा संपन्न ll


श्रीम.सुनिता इंगळे( सूर्यवंशी) यांच्या गुज मनीचे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा संपन्न ll

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

पुणे येथील नाथ पै हाॕल,साने गुरुजी स्मारक,राष्ट्रसेवादल,सिंहगड रोड या ठिकाणी एक्टीव्ह टिचर्स म हाराष्ट्र सामाजिक प्रतिष्ठान संचलीत राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी कोपरगाव येथील शिक्षिका श्रीम.सुनिता इंगळे सूर्यवंशी यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

           आदरणीय वसंत काळपांडे साहेब  माजी संचालक scert पुणे ,आदरणीय दिनकर पाटिल साहेब बालभारती संचालक तथा माध्य.व उच्च.माध्यमिक शिक्षण मंडळ,आदरणीय प्राची साठे मॕम माजी शिक्षणमंत्री श्री.विनोद तावडे साहेब यांच्या यांच्या हस्ते आज दि,१७ जाने.रोजी पुणे येथे माझा पहिला कवितासंग्रह गुज मनीचे याचे प्रकाशन करण्यात आले.हा कार्यक्रम एटीएम चे राज्यसंयोजक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आदरणीय विक्रम अडसूळ सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.या कार्यक्रमास नारायण मंगलाराम सर,ज्योतीताई बेलवले,विशाल तायडे साहेब, अश्वीनी सोनवणे मॕडम (गटशिक्षणाधिकारी भोर),ज्ञानदेव नवसरे सर,नवनाथ सूर्यवंशी सर,राज्य भरातून अनेक शिक्षणप्रेमी,शिक्षक उपस्थित होते.

       गुज मनीचे या काव्यसंग्रहात ३० कविता असून काव्यसंग्रहास श्री.संतोष तांदळे सरांची प्रस्तावना लाभली असून कवी श्री.ज्ञानेश्वर शिंदे यांनी शुभेच्छा संदेश दिला आहे.या काव्यसंग्रहात कवयित्रीने आजूबाजूला घडणाऱ्या घटना,भावलेले विषय यावर आधारीत कविता शब्दबद्ध केल्या आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News