२०२० च्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना दुसऱ्या हफ्त्याची ४ कोटी ६४ लाखाची नुकसान भरपाई दयावी !!-आ. आशुतोष काळे


२०२० च्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना दुसऱ्या हफ्त्याची ४ कोटी ६४ लाखाची नुकसान भरपाई दयावी !!-आ. आशुतोष काळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी .

 जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत कोपरगाव विधानसभा मतदार संघात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर येवून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आ. आशुतोष काळे यांनी झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागाला दिल्यामुळे नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयातून यापूर्वीच नुकसानभरपाईच्या मदतीच्या पहिल्या हफ्त्याची ३ कोटी १ लाख रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम मागील वर्षी शेतकऱ्यांना मिळालेली आहे व दुसऱ्या टप्प्यातील ४ कोटी ६४ लाख ५८ हजार रुपयांची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशी  माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. 

               जून ते ऑक्टोबर २०२० या महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोदावरी नदीला पूर येऊन उभ्या पिकांचे व काढणी केलेल्या पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला होता. शेतातील पिकांची काढणी करून मोकळ्या जागेवर सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांचे ज्या ठिकाणी ढिगारे लावले होते त्या पिकांना जागेवरच मोड आल्यामुळे त्या पिकांचे देखील नुकसान झाले होते. या झालेल्या नुकसानीची आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्वतः पाहणी केली होती. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागाला देवून सर्व पंचनामे देखील करून घेतले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी मदत,पुनर्वसन व महसूल विभागाकडे  सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ३ कोटी १ लाख रुपयांची नुकसान भरपाई महाविकास आघाडी सरकारने मागील वर्षी दिलेली आहे. व या नुकसानीच्या दुसऱ्या टप्प्याची ४ कोटी ६४ लाख ५८ हजार रुपयांची रक्कमही महाविकास आघाडी सरकारने देण्याचा निर्णय घेऊन लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून नैसर्गिक संकटाच्या वेळी शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेची चाके रुतलेली असतांना महाविकास आघाडी सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा दुसरा हफ्ता दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना. अजितदादा पवार, मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानले आहे.  

                             

जाहिरात
Search
विडिओ
Recent News