महाराष्ट्र भुमी न्यूज च्या बातमीचा इफेक्ट,रेल्वे उड्डाणपुलावरील कामाला सुरुवात, गेलं दौंड खड्ड्यात मथळ्याखाली बातमीचा परिणाम


महाराष्ट्र भुमी न्यूज च्या बातमीचा इफेक्ट,रेल्वे  उड्डाणपुलावरील कामाला सुरुवात, गेलं दौंड खड्ड्यात मथळ्याखाली बातमीचा परिणाम

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड रेल्वे उड्डाणपुलावरील दोन महिन्यांपासून एकेरी वाहतूक सुरू असून,वाहतूक कोंडी होऊन खड्यामुळे अपघात होत असल्याचे महाराष्ट्र भुमी मराठी न्यूज चैनलने याविषयी बातमी प्रसिद्ध केली होती,त्याचा परिणाम दिसून आला आहे, कामगार आणि मशनरी घेऊन माती काढण्याचे काम सुरू केले आहे, गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक रस्ते कामामुळे एका बाजूने सुरू आहे,ठेकेदार मनमानी करीत असून पेट्रोल पंपा समोर रस्ता एकेरी रस्त्यावर येताना दुभाजकाजवळ खड्डा आहे त्यामध्ये साधा मुरूम टाकण्याची तसदी घेतली नाही वाहने तेथे ओबडधोबड असल्यामुळे अडकत आहेत,आणि त्या एकेरी वाहतुकीच्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडलेले आहेत,जड वाहने बंद पडत आहेत, आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे,पुढे बारामती बाजूला वळताना दुभाजकाचा मोठा खड्डा तेथे आहे मोठी वाहने वळताना अडचण येत आहे,तर रात्रीच्या वेळी पुण्याहून येणारी वाहने  त्या खड्यात आदळत आहेत,मागच्या महिन्यात दुचाकीवरील कुटूंब तेथे रात्रीच्यावेळी पडले  त्यांच्याबरोबर लहान मुले होती  सुदैवाने कोणाला लागले नाही तेथे बंदोबस्ताला असलेले पोलीस पटकन धावून आले,समोरून दुसरे वाहन असते तर मोठा अनर्थ झाला असता,या ठेकेदारांना जनतेचे देणेघेणे नाही,त्याठिकाणी  अपघातही झाले आहेत, दौंड शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था पहिली तर असे वाटते दौंड ला कोणी वालीच उरला नाही.दौंड शहर आणि लगतच्या सर्वच रस्त्यांची कामे जलद गतीने करून जनतेला सुखाचा प्रवास करू द्यावा अशी मागणी आता सर्वसामान्य जनता करू लागली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News