कोरोना संकटाच्या प्रतिकूल प्ररिस्थितही शेवगाव रोटरी क्लबने चांगले काम केले आहे. असे गौरवोदगार रोटरी क्लबचे प्रांतपाल हरिश मोटवाणी यांनी काढले


कोरोना संकटाच्या प्रतिकूल प्ररिस्थितही शेवगाव रोटरी क्लबने चांगले  काम केले आहे. असे गौरवोदगार रोटरी क्लबचे प्रांतपाल हरिश मोटवाणी यांनी काढले

शेवगाव ः रोटरीच्या सभेत प्रांतपाल हरिश मोटवाणी यांचे स्वागत करताना अध्यक्ष प्रा. किसनराव माने. समवेत, बाळासाहेब चौधरी, डॉ. पुरूषोत्तम बिहाणी आदी.

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीतर्फे शेवगाव येथे आयोजित सभेत मार्गदर्शन करताना प्रांतपाल मोटवाणी बोलत होते. यावेळी सहप्रांतपाल अॅड. अभय राजे,  शेवगाव रोटरीचे अध्यक्ष प्रा. किसनराव माने, सचिव बाळासाहेब चौधरी,  डॉ. पुरुषोत्तम बिहाणी आदी व्पासपीठावर उपस्थित होते.  या वेळी ऊसतोडणी कामगारांसाठी काम करणाऱ्या उचल फौंडेशनला मोटवणी यांच्या हस्ते आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.

 शेवगाव रोटरीने गेल्या पाच वर्षांत पर्यावरण, आरोग्य, महिला सबलीकरण, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. तसेच अमरापूर आरसीसी आणि इन्ट्रॅक्ट क्लबने सामाजिक कामाची सुरूवात चांगली केली आहे. कोरोना काळात वृक्षारोपण, कोरोना योद्ध्यांना मास्क व  सॅनिटायझरचे वाटप, कोरोना योद्ध्यांचा गौरव, नेत्र तपासणी, पत्रकारांची आरोग्य तपासणी असे चांगले उपक्रम राबविले आहेत, अशा शब्दांत मोटवाणी यांनी कौतुक केले.

 या वेळी माजी सहप्रांतपाल डॉ.संजय लड्डा, डॉ.मनीषा लड्डा, उज्वला राजे, समन्वयक गुप्ता,  डॉ.गणेश चेके, प्रा. अण्णासाहेब दिघे,  प्रा. काकासाहेब लांडे, मनेष बाहेती, डॉ.मयूर लांडे, डॉ.हरीचंद्र गवळी, बाळासाहेब मुरदारे, दीपक तागड, प्रा. के. वाय. नजन सर, प्रवीण लाहोटी, डॉ. आशिष तोतला,  सुधाकर जावळे, संदीप सुसे तसेच अमरापूर आरसीसी अध्यक्ष महेश लाडणे, सचिव दीपक भुक्कन, इन्ट्रॅक्टचे अध्यक्ष वेदांत बोरुडे, सचिव वैष्णवी चौधरी आदि उपस्थित होते.

 प्रास्ताविक प्रा. माने यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दिलीप फलके यांनी केले.  आभार सचिव बाळासाहेब चौधरी यांनी मानले.

- वंचितांच्या चेह-यावर आनंद फुलविण्यासाठी रोटरीने सामाजिक कार्याचा वसा सुरू ठेवला आहे.    आपण दुस-यांना वाटलेला आनंद दुप्पट होऊन आपणाला मिळतो. प्रत्येक व्यक्तीने स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद वाटायला शिकलं पाहिजे. - हरिश मोटवाणी , प्रांतपाल रोटरी क्लब - 

----------------------------------------------------

जाहिरात
Search
विडिओ
Recent News