भिगवण मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्व. रमेश जाधव प्रेरित श्रीनाथ ग्रामविकास पॅनला सतरा पैकी सोळा जागेवर घवघवीत यश: पराग जाधव.


भिगवण मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्व. रमेश जाधव प्रेरित श्रीनाथ ग्रामविकास पॅनला  सतरा पैकी सोळा जागेवर घवघवीत यश: पराग जाधव.

नानासाहेब मारकड भिगवन प्रतिनिधी:
 भिगवण मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्व. रमेश जाधव प्रेरित श्रीनाथ ग्रामविकास पॅनला सोळा जागेवर घवघवीत यश तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलला केवळ एका जागेवर समाधान मानावे.
श्रीनाथ पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे वार्ड क्र.१ – सत्यवान अशोक भोसले,दीपिका तुषार क्षीरसागर वार्ड क्र.२- अमितकुमार वाघ,स्वाती दत्तात्रय धवडे,प्रतिमा संजय देहाडे,वार्ड क्र- स्मिता जयदीप जाधव,तानाजी वायसे,वार्ड क्र.४- पराग रमेशराव जाधव,गुराप्पा गंगाराम पवार,मुमताज जावेद शेख,वार्ड क्र.५-तुकाराम रामचंद्र काळे,सईबाई मच्छींद्र खडके,तस्लीम जमीर शेख,वार्ड क्र.६- कपिल माधवराव भाकरे,हरिश्चंद्र गोविंदराव पांढरे,शितल बाबासाहेब शिंदे तर भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार- निलीमा सचिन बोगावत. मागील पंचवार्षिक निवडणूकीत रमेश जाधव यांच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीला आव्हान देत राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळविला होता.
मात्र विकास कामे करत असताना राजकारण,कामे दर्जेदार न केल्याचा आरोप करत विरोधकांनी प्रचाराची राळ उठवली त्याचप्रमाणे सत्ता विकेंद्रीकरणाच्या नावाखाली पाच- सहा सरपंच,व उपसरपंच बदलण्यात आले  याचा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पॅनेलला बसला.त्यामध्ये काही अपक्षांदेखील उडी घेतल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पॅनेलला पराभवाचा सामना करावा लागला. सर्व जाती- धर्माच्या उमेदरवारांना पॅनेलने सामावून घेवून सत्ताधाऱ्यांच्या पॅनेलला कडवे आव्हान दिले तसेच प्रत्येक वार्डात तोडीस – तोड उमेदवार दिले प्रचाराचे योग्य नियोजन करत व आगामी काळात भिगवणचा चांगला प्रकारे विकास करु असे आश्वासन दिले तर स्व. रमेश जाधव यांच्या स्वप्नातील विकास करु आश्वासन देत मतदारांना साद घातली होत.
स्व. रमेश जाधव यांना विजयाच्या रुपाने श्रद्धांजली…
माजी सभापती भिगवणचे सरपंच रमेश जाधव यांचे मागील वर्षी एका अपघातात निधन झाले होते. त्यांची भिगवणमध्ये सत्ता परिवर्तन करण्याची इच्छा होती ती आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली असून त्यांना आज भिगवणकरांनी श्रद्धांजली अर्पण केल्याची भावना माजी जि. प. सदस्या प्रमिला जाधव यांनी व्यक्त केली.
ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती यामुळे आम्हाला यश मिळाले आहे. आगामी काळात जनतेच्या सेवेसाठी कायम राहणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News