कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत मतमोजणी संपन्न !!


कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत मतमोजणी संपन्न !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सकाळी ९:०० वाजता तहसिल कार्यालय कोपरगाव येथे सुरु करण्यात आली.

निवडणुक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांचे निगराणी खाली २९ ग्रामपंचायतीची मतमोजणी प्रक्रीया एकाचवेळी सुरु करण्यात आली होती

प्रत्येक गावांचे फेरीनिहाय मतमोजणी घेण्यात आली.यात ६ पर्यंत फेरी घेण्यात आल्या.२९ ग्रामपंचायतीच्या २७९ जागांसाठी ७ जागा बिनविरोध झाल्याने ६११ उमेदवारांमधून २७२ जागांमध्ये सर्वाधिक मते मिळालेले उमेदवार  व त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार यांची घोषणा ग्रामपंचायत निहाय नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कडून करण्यात आली.

मतमोजणी केंद्रावरील प्रत्यक्ष कामकाज राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी योगेश चंद्रे यांचे निगराणी खाली निवडणूक नायब तहसिलदार पी.डी.गोसावी,अरुण रणनवरे यांचे सह विविध खातेनिहाय नियुक्त अधिकारी यांनी पाहिले.

उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक दौलतराव जाधव,कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बोरसे, पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे,सचिन इंगळे यांचेसह पोलिस कर्मचारी, राज्य राखीव दलाची तुकडी,पोलिस पाटील यांनी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 २९ ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रीये दरम्यान उमेदवार, उमेदवार यांचे सहकारी,मतदार कोपरगाव तालुक्यातील विविध खातेनिहाय अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने हाताळली.त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुलभ झाली. असे आवर्जुन सांगत निवडणुक प्रक्रियेतील सर्व घटकांचे राज्य निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News