मुकुंद भागवत आगलावे यांचे निधन


मुकुंद भागवत आगलावे यांचे निधन

शिर्डी ,राजेंद्र दूनबळे, (प्रतिनिधी) 

सावळीविहीर येथील युवक व सध्या भारतीय सैन्यदलात मेजर असणारे मुकुंद भागवत आगलावे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या निधनाचे वृत्त सावळीविहीर व परिसरात येताच मोठी हळहळ व्यक्त होत आहे, सर्व थरातून दुःख व्यक्त  होत आहे,

 मेजर मुकुंद भागवत आगलावे हे सावळीविहीर येथील मूळचे रहिवाशी असून त्यांचे शालेय शिक्षण येथे झाले होते,नंतर पुणे येथे इंजीनियरिंग ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपले वडील सैनिक दलात असल्यामुळे  भारतीय सैन्य दलात  जाणे पसंत केले होते, व ते भारतीय सैन्यदलात भरती झाले, सुमारे पंधरा ते सतरा वर्ष भारतीय सैन्यदलात ते सेवा करीत होते, व सध्याही  अमृतसर येथे कार्यरत होते, त्यांना अल्पशा आजार झाल्यामुळे त्यांना पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते व उपचार सुरू होते,  मात्र या अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले आहे ,सावळीविहीर येथील ते अमरदीप संघटनेचे ज्येष्ठ सदस्य होते, अमरदीप संघटना बळकट करण्यासाठी त्यांचा पूर्वी मोठा हातभार होता, ते सर्वत्र मिळून मिसळून वागणारे एक व्यक्तिमत्त्व होते, सर्वांशी आपुलकीने बोलणारे,वागणारे असे तरुण व मनमिळावू त्यांचे व्यक्तिमत्त्व होते, सुट्टीला गावी सावळीविहीर येथे आल्यानंतर ते सर्वांना भेटत व अडचणीत असलेल्याना वेगवेगळ्या प्रकारांनी मदतही करीत असत, त्यामुळे ते सर्व परिचित होते, भारतीय सैन्यदलातुन देशसेवा करीत असताना त्यांना देशाचे महामहीम राष्ट्रपती  यांनीही गेल्या काही वर्षापूर्वी प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला होता, त्यांची नुकतीच सैन्यदलात मोठ्या पोस्टवर बढती आदेश निघाला होता, मात्र काळाने त्यांना घेरले व त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे, अचानक त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याचे वृत्त सावळीविहीर येथे धडकताच परिसरात मोठे दुःख व  हळहळ व्यक्त होत आहे,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News