संजीवनी युवा प्रतिष्ठानचे वतीने कुंभारी शाळेत हॅन्ड सॅनिटायझरचे वाटप ! !


संजीवनी युवा प्रतिष्ठानचे वतीने कुंभारी शाळेत हॅन्ड सॅनिटायझरचे वाटप ! !

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

संजीवनी युवा प्रतिष्ठान यांचे वतीने वर्धापनदिना निमित्त कुंभारी येथिल गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयात हॅन्ड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

संजीवनी युवा प्रतिष्ठान दरवर्षी आपल्या वर्धापनदिना निमित्त संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे तसेच माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतुन विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात याही वर्षी कोरोना संकट काळात आपले योगदान देणाऱ्या महीला पोलीस भागिनी सरकारी दवाखान्यात काम करणाऱ्या आरोग्य सेविका,नगर परीषदेतील महीला स्वच्छता कर्मचारी,यांचा संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे तसेच रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते साडी,गुलाबपुष्प व सन्मानपत्र देउन गौरवण्यात आले.

 तसेच कुंभारी येथील गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयात हॅन्ड सॅनिटायझसचे वाटप शाळेचे मुख्याध्यापक गिताराम ठाणगे (सर ) यांच्या उपस्थितीत  करण्यात आले.

यावेळी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे कुंभारी येथील कार्यकर्ते तसेच शाळेचे सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News