संजय भारती धारणगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील हिंगणी ग्रामपंचायतीच्या एकुण ७जांगा पैकी५जागा आमदार.आशुतोष काळे यांच्या नेतत्वाखाली राष्ट्रवादी काँगेसने र्निविवाद वर्चस्व मिळविले आहे.
कोपरगाव तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या 29 ग्रामपंचायत निवड नुकीचे निकाल हाती आले असुन तालुक्यातील २९ ग्रामपंचायत पैकी 22 भाजपाच्या, 6 ग्रामपंचायत राष्ट्रवादीने तर 1 परजने गट आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.
त्यातील हिंगणी ग्रामपंचयातीवर या अगोदर भाजपा( कोल्हे गटा ) ची सत्ता होती परंतु या निवडणुकीत मतदारांनी बदल करत राष्ट्रवादी ( काळे गटा )च्या ताब्यात दिली असुन भाजपाला २ जागेवर समाधान मानावे लागले आहे.
प्रभागनिहाय उमेदवारांची मत संख्या पुढीलप्रमाणे
प्रभाग क्र १
पवार रामभाउ साहेबराव-१५२ (विजयी )
पवार सागरसोपान-१२७
पवार ज्योती दत्तात्रय -१४५ ( विजयी )
पवार सुनिता शिवाजी -१३४
पवार आश्वीनी धनराज -१४५ ( विजयी )
पवार हिराबाई रावसाहेब -१३१
प्रभाग क्र. २
दळवी शामराव गोमा-९४
भँवर रतन पांडुरंग -१४६ ( विजयी )
चंदनशिव आशाबाई बापु-१५१
( विजयी )
चंदनाशिव नंदा सुर्यभान -९१
प्रभाग क्र .३
कुदळे मच्छिंद्र रघुनाथ -८० ( विजयी )
पवार रघुनाथ भानुदास -४७
बर्डे मिना सुभाष - ५०
माळी हिराबाई निवृत्ती -७६ ( विजयी )