लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.तर्फे कोरोना योद्धा पुरस्कार वितरण!! कोरोना योद्धे हेच खरे देवदूत आहे-मनीषा राठोड


लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.तर्फे कोरोना योद्धा पुरस्कार वितरण!! कोरोना योद्धे हेच खरे देवदूत आहे-मनीषा राठोड

मनमाडरोड वरील लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.यांच्या तर्फे बूथ हॉस्पिटलचे मेजर देवदान कळकुंबे,महावीर प्रतिष्ठानचे हर्षल बोरा,चेतन भंडारी,जयंत येलूलकर,राजेंद्र उदागे,सुरेश इथापे यांना 'कोरोना योद्धा' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी मॅनेजर मनिषा राठोड,ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे,अरविंद गायकवाड,भूषण खिस्ती,गायत्री खिस्ती,सुदीप मुळे,प्रतिभा मुळे,विवेक निसळ,हर्षल विटणकर,स्नेहल बडवे, महेश चौधरी,व्यंकटेश संभार आदी.(छाया -अमोल भांबरकर)

नगर(-प्रतिनिधी संजय सावंत) कोरोना महामारीच्या काळात अनेकांना दुःखाला सामोरे जावे लागले.माणूस माणसापासून दुरावला गेला.लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार गेले,उपासमारीची वेळ आली.अशा वेळेस माणुसकीचा धर्म पाळून कोरोना योध्यांनी किराणा किट वाटप करून,दोन वेळचे भोजन देऊन तसेच हॉस्पिटलच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य करून माणुसकीचे दर्शन घडविले.समाजाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांना दूर करण्याचे काम कोरोना योद्ध्यांनी केले आहे.म्हणूनच कोरोना योद्धे हेच खरे देवदूत आहे.असे प्रतिपादन लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.च्या मॅनेजर मनिषा राठोड यांनी केले.                                             मनमाडरोड वरील लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.यांच्या तर्फे बूथ हॉस्पिटलचे मेजर देवदान कळकुंबे,महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षल बोरा,उपाध्यक्ष चेतन भंडारी,रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर,नंदराज केटरर्सचे राजेंद्र उदागे,मनपाचे अभियंता सुरेश इथापे यांना 'कोरोना योद्धा' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.व महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व तिळगुळ वाटप करण्यात आले.ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे,अरविंद गायकवाड, पुष्कर तांबोळी,राकेश भंडारी,निखिल गांधी,श्रीपाल शींगी,नितीन हातवळणे,भूषण खिस्ती, गायत्री खिस्ती,सुदीप मुळे,प्रतिभा मुळे,विवेक निसळ,हर्षल विटणकर,स्नेहल बडवे,महेश चौधरी,व्यंकटेश संभार आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना जयंत येलूलकर म्हणाले की,सामाजिक बांधिलकी जपून नगर शहरातील अनेक लोकांनी माणुसकीचा झरा जिवंत ठेवला.माणुसकीचा धर्म पाळून या कोरोना योद्ध्यांनी पदरमोड करून नागरिकांना मदतीचा हात देऊन शहराचे आरोग्य चांगले ठेवण्यास सहकार्य केले.सामाजिक बांधिलकी जपत लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी च्या वतीने कोरोना योध्यांचा सत्कार करून पुढील काळात असे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी प्रेरणा दिली आहे.                              

   याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे म्हणाले की लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.या संस्थेची स्थापना १९९५ साली करण्यात आली.ही संस्था एक विश्वासू संस्था आहे.या संस्थेचा महाराष्ट्र,कर्नाटक,गोवा,दिल्ली या राज्यात विस्तार आहे.ट्रॅव्हल्स,टूर्स व हॉटेल्स अश्या अनेक व्यवसायात मोठी गुंतवणूक असून २५ वर्ष पूर्ण होऊन ५००० कोटींच्या ठेवी आहेत.नगर शाखेने ६व्या वर्षात पदार्पण केले आहे.या संस्थेची यशस्वी वाटचाल अखंड सुरु आहे.भारतातील ही पहिलीच को-ऑप संस्था असून संस्थेने आर्थिक व्यवहारात बरोबरच सामाजिक सामाजिक कार्यातही पुढाकार घेतला आहे.कोरोना योध्यांचा सत्कार करून त्यांनी समाजाला दिशादर्शक असे काम केले आहे.                                                                  कार्यक्रमाचे सूत्र संचालन हर्षल विटणकर यांनी केले तर आभार स्नेहल बडवे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी सभासद मोठ्या संख्येनी उपस्थित होते.              

जाहिरात
Search
विडिओ
Recent News