घरकुल वंचितांचा सत्यबोधी उत्तरायण सुर्यनामा घरकुल वंचितांची घरे होण्यासाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठेशिवाय पर्याय नसल्याचे जाहीर


घरकुल वंचितांचा सत्यबोधी उत्तरायण सुर्यनामा  घरकुल वंचितांची घरे होण्यासाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठेशिवाय पर्याय नसल्याचे जाहीर

घरकुल वंचितांच्या नियोजित प्रकल्पाच्या ठिकाणी वनश्री डोकेनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या फलकाचे अनावरण

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - राजकारणी, नेते, नोकरदार मोठ्या प्रमाणात आपला काळा पैसा शहरी भागातील जागेत गुंतवून देशात गुंठामंत्री अर्थव्यवस्था खोलपर्यंत रुजली असल्याचा मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने सत्यबोधी उत्तरायण सुर्यनामा करण्यात आला. तर घरकुल वंचितांची घरे होण्यासाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठेशिवाय पर्याय नसल्याचे जाहीर करुन, निंबळक येथील घरकुल वंचितांच्या नियोजित प्रकल्पाच्या ठिकाणी वनश्री डोकेनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, प्रदिप झरेकर, संजय स्वामी, अशोक भोसले, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अंबिका जाधव, फरिदा शेख, सुशिला देशमुख, पोपट भोसले, बबती खंडीझोड, बाबा शेख, परवीन शेख, सुलभा आडेप आदींसह महिला उपस्थित होत्या. 

अनेकांनी काळा पैसा शहरातील जमीनीत गुंतवल्याने जमीनीचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे गोर-गरीबांना घर घेणे अवघड झाले आहे. सर्व राजकारणी शहरी भागात कोट्यावधी रुपयांचा काळा पैसा जमीनीत गुंतवून सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा भोगत आहे. यासंदर्भात सरकारने कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले नाहीत. जागेबाबत मागणी-पुरवठामध्ये कृत्रिम टंचाई निर्माण करून उघडपणे काळा पैसा पोसला जात असल्याचे सत्यबोधी उत्तरायण सुर्यनाम्यातून यावेळी सिध्द करण्यात आले. सत्ताधारी मंडळींनी घरकुल वंचित, अशिक्षित व संघटितांची मत पैश्याच्या जोरावर खरेदी करून मागच्या दाराने सत्ता मिळविली. या सत्तेसाठी गुंठामंत्री अर्थव्यवस्थेने त्यांना जमीनीच्या माध्यमातून आर्थिक साथ दिली. आत्मनिर्भर आवास भूमीगुंठेशिवाय घरकुल वंचितांना सामाजिक न्याय मिळणार नाही. हे उद्दीष्ट समोर ठेऊन संघटनेच्या माध्यमातून घरकुल वंचितांना 80 हजार रुपये मध्ये एक गुंठा जमीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याशिवाय 9 मीटरचे रस्ते, पाणी, वीज व सरकारी अनुदानासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट करण्यात आले.  

देशातील गरिबी हटविण्यासाठी सामान्य लोकांनी संघटीतपणे सातत्याने लढा दिला पाहिजे. सर्वसामान्य हक्कासाठी संघटितपणे एकत्र येत नसल्याने त्यांच्या विचार केला जात नाही. सत्ताधारी सत्तेतून पैसा व पैश्यातून सत्ता मिळवण्यात पटाईत झाले असून, त्यामुळे त्यांना स्वत:च्या हिताशिवाय वंचितांचे प्रश्‍न दिसत नाही. संघटनेच्या वतीने घरकुल वंचितांना हक्काची घरे मिळण्यासाठी मागील सहा वर्षापासून आंदोलने सुरु होती. मात्र एकही लोकप्रतिनिधी व मंत्री त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आस्थेने पुढे आला नाही. फक्त घोषणांचा पाऊस पाडून सत्ता भोगण्याचे काम राजकारणी करीत आहे. घरकुल वंचितांना स्वत:ची घरे स्वत:च्या संघर्षातून निर्माण करावी लागणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News