साप्ताहिक सहकारनामा व डेली न्यूज पोर्टलचा प्रथम वर्धापनदिन संपन्न


साप्ताहिक सहकारनामा व डेली न्यूज पोर्टलचा प्रथम वर्धापनदिन संपन्न

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी:

केडगाव : निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ असलेल्या साप्ताहिक सहकारनामा व डेली न्यूज पोर्टलचा प्रथम वर्धापनदिन रविवार दि. 17 रोजी बोरमलनाथ, चौफुला येथील श्री एकनाथ भिमाजीराव गुरव सभागृहात पार पडला. सदर कार्यक्रमास दौंड तालुक्याच्या माजी आमदार रंजना कुल यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी सहकारनामाचे संपादक अब्बास शेख व संचालिका रुबिना शेख यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

      आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना अब्बास शेख यांनी सहकारनामा सुरू करण्याचा त्यांचा उद्देश काय आहे हे अधोरेखित करताना सांगितले की, ज्या पत्रकारांच्या काही महत्वाच्या बातम्या इतर दैनिक वा न्यूज चॅनलला लागत नाहीत त्या बातम्यांना प्रसिद्धी देण्याचे काम सहकारनामा करत आहे. तसेच सर्व राजकीय पक्ष, संघटना, घटना यांच्या बातम्यांना प्रसिद्धी देऊन त्यांना योग्य तो न्याय मिळवून दिला जाईल. सहकारनामा हे नावाप्रमाणेच सर्वांच्या सहकार्याने वाटचाल करत असून समाजात दैनंदिन जीवनात घडणाऱ्या बातम्या अचूकपणे व तत्परतेने वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत राहणार आहे.

      यावेळी माजी आमदार रंजना कुल यांनी आपल्या भाषणातून शुभेच्छा देताना दौंड तालुक्यातील एकमेव शासकीय नोंदणीकृत साप्ताहिक सहकारनामा ही तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट असून अब्बास शेख हे एक अभ्यासपूर्ण बातम्या देणारे पत्रकार आहेत व बातम्यांकरिता दुसऱ्या दिवसाची वाट न पाहता सहकारनामाच्या माध्यमातून ते आपल्याला झटपट बातम्या  पुरवतात असे कौतुकोद्गार काढले. एका वर्षात सहकारनामाने 30 लाख वाचक मिळविले असून पुढच्या वर्षी 1 कोटींचा टप्पा पार करेल अशी आशाही व्यक्त केली.

      मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला अब्बास शेख यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. यामध्ये दौंड तालुक्याच्या माजी आमदार रंजना कुल, रेणुका दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन पोपट ताकवणे, महा. तमाशा थिएटर चालक संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव, भीमा पाटस कारखान्याचे व्हा. चेअरमन नामदेव बारवकर, रयत क्रांती संघटनेचे प्रदेश प्रवक्ते भानुदास शिंदे, आप्पासाहेब हंडाळ, आशिष शेळके, मोतीलाल दिवेकर, अशोक हंडाळ, सोमनाथ गडदे, डी. डी. बारवकर, माऊली ताकवणे, किरण देशमुख, अजित शेलार, पप्पूराज हनमघर, समीर सय्यद, ईसाक शेख, शफिक शेख, API हणमंत गायकवाड तसेच दौंड तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य आदी मान्यवरांचा समावेश होता.

      तत्पूर्वी सहकारनामाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोशाळेमध्ये मोफत चारा वाटप करण्यात आले व अखेरीस सहकारनामा साप्ताहिकाच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News